बंगळूरू : विराट कोहलीचा खराब फॉर्म काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात तो 71 वं शतक झळकावेल अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र विराटला दोन्ही डावांमध्ये मिळून केवळ 36 रन्स करता आले. दरम्यान यावर आता भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत विधान केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंक बॉल टेस्टमध्येही विराट कोहली फ्लॉप झाला आहे. या टेस्टमध्ये पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात त्याला केवळ 13 रन्स करता आले. या दोन्ही डावांमध्ये विराट कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला आहे. यानंतर विराटची नेमकी कमकुवत बाजू सांगितली आहे. 


सुनील गावस्कर म्हणाले, विराट कोहली ज्या शॉटवर आऊट झाला, तो बॉल या शॉटसाठी नव्हता. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तो ज्या प्रकारे बॅकफूटवर खेळला तसाच या मॅचमध्येही त्याने फ्रंट पॅडजवळ क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला. जेव्हा चेंडू पॅडवर लागला तेव्हा तो विकेटच्या समोर असल्याचं त्याला दिसलं. बॉलच्या लाईनऐवजी क्रॉस शॉट खेळण्याचे परिणाम त्याला भोगावे लागलेत.


असं करू शकतो कमबॅक


तुम्हाला स्वतःला पटवून द्यावं लागेल की, तुम्हाला असे शॉर्ट्स खेळायचे आहेत, ज्यावर बॅटचा पूर्णपणे वापर होईल. असा प्रयत्न करा आणि अशा गोष्टी करा ज्यामुळे त्याला खराब पॅचमधून बाहेर पडण्याची संधी मिळते, असंही गावस्कर यांनी म्हटलंय.