मुंबई :  भारतीय क्रिकेटर विराट कोहलीसाठी हा काळ काही योग्य दिसत नाही. विराटने गेल्या २ वर्षांत एकही शतकं केलेलं नाही तर दुसऱ्या बाजूला त्याला तिन्ही फॉर्मेटमधून आपलं कर्णधारपद सोडलं आहे. विराटने गेल्यावर्षी आयपीएलचा संघ आरसीबीमधलं कर्णधारपरद सोडलं. एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. हे मोठं कारण पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आलं आहे. 


विराट 'या' गोष्टीमुळे हैराण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीए २०२१ नंतर आरसीबीचं कर्णधारपद सोडणाऱ्या विराटने सांगितलं की, त्याला स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. कामाच्या ताण-तणावामुळे मी हा निर्णय घेतला आहे. 


सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून T20 विश्वचषक ही त्याची शेवटची स्पर्धा असेल, असं देखील कोहलीने म्हटलं. यानंतर त्याने आयपीएलचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 


यानंतर वनडे सामन्याचं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर त्याने टेस्ट टीमचं कर्णधार पद सोडलं. एकापाठोपाठ विराटने सगळ्याच कर्णधार पदावरून राजीनामा दिला. 


सर्वात मोठं गुपित उलघडलं 


कोहलीने आरसीबीचं कर्णधारपद सोडल्यानंतर 'द आरसीबी पॉटकॉस्ट'मध्ये म्हटलं की, 'एखाद्या गोष्टीला पकडून राहणाऱ्या लोकांपैकी मी नाही. एवढंच नाही तर मला हे देखील माहित आहे की, मी खूप काही करू शकतो. पण या प्रक्रियेचा आनंद घेतला नाही तर मी काम करू शकणार नाही.'


पुढे कोहली म्हणतो की, एखादा क्रिकेटर जेव्हा असा निर्णय घेतो तेव्हा तो काय विचार करतो हे समजणे लोकांना खूप अवघड असते.


आपली 100 वी कसोटी खेळण्याच्या तयारीत असलेला कोहली म्हणाला, 'लोक जोपर्यंत तुमच्या जागेवर किंवा त्या परिस्थितीत नसतील तोपर्यंत तुमचा निर्णय समजणे खूप कठीण आहे. लोकांच्या स्वतःच्या अपेक्षा आहेत.


पुढे लोकं म्हणतात की, अरे हे कसं झालं? आम्हाला धक्काच बसला. मी लोकांना समजावून सांगतो की, मला स्वतःसाठीही थोडा वेळ हवा आहे आणि मला कामाचा ताण देखील सांभाळायचा होता. आरसीबीने सुरुवातीपासून कधीही आयपीएलचे विजेतेपद जिंकले नाही.


कोहलीला हवंय आरामदायी आयुष्य 


कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाबाबत सुरू असलेल्या चर्चेला कोहलीने पूर्णविराम दिला आहे. 


पुढे त्याने म्हटले की, “वास्तविक असे काहीही नव्हते. मी माझे जीवन अतिशय साधेपणाने जगतो. जेव्हा मला निर्णय घ्यावा लागतो तेव्हा मी निर्णय घेतो आणि जाहीर करतोय.