मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विजयाच्या शिखरावर पोहचत आहे. त्याचप्रमाणे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने आपल्या फिटनेसचा देखील एक वेगळा स्तर निर्माण केला आहे. विराट आपल्या फिटनेसची काळजी घेत टीमला देखील पुढे घेऊन जाण्याचा विचार करत आहे. आणि या सगळाचा रिझल्ट आपल्याला दिसतच आहेय टीम इंडिया जगभरातील टीमपैकी एक सर्वश्रेष्ठ फिल्डींग टीम बनली आहे. 


कुणाला घाबरतो विराट कोहली?


तसेच विराट कोहलीने बुधवारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उद्घाटन सोहळ्यात एक महत्वपूर्ण खुलासा केला. विराट लहानपणी कोणत्या क्रिकेट स्टारला घाबरत होता याची त्याने कबूली दिली आहे. बिशन सिंह बेदी यांच्याकडून दिल्ली कॅप आणि विशेष ट्रॉफी मिळवली आहे. या कार्यक्रमात कोहलीने खास आठवण शेअर केली. बेदी हे दिल्ली कोच असल्यापासून फिटनेसच्या बाबतीत प्रचंड आग्रही होते. 


फिटनेसच्या बाबतीत बेदी सरांकडून भरपूर चांगल मार्गदर्शन मिळालं आहे. अंडर १५, अडंर १७ आणि अंडर १९ मध्ये मी बेदी सरांपासून प्रचंड लांब जात असे. कारण त्यांचा फिटनेसचा आग्रह त्यावेळी भीतिदायक होता. पण आता मी विश्वासाने सांगू शकतो की आज मी माझ्या जीवनात बेदी सरांमुळे यशस्वी आहे. आणि आज प्रगतीपथावर असलेले अनेक लोकं बेदी सरांना आठवतात. 


२९ वर्षाचा कोहली सांगतो की, मी जेव्हा या असोसिएशनमध्ये येत असे तेव्हा मी दिल्ली क्रिकेटच्या सुपर स्टार्सना खेळताना पाहत असे. मी कायम त्यांना बघत आलो आणि त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केला. तसेच आज मी त्यांच्यासोबत खेळत आहे आणि त्या टीमचा कॅप्टन असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 


दिल्लीचे अनेक दिग्गज क्रिकेटर १९८३ वर्ल्ड कप विजेता टीमचे सदस्य मोहिंदर अमरनाथ, मदन लाल आणि किर्ती आझाद, चेतन चौहान यांना देखील सन्मानित केलं आहे. या कार्यक्रमाला कोहलीसोबत विरेंद्र सहवाग आणि इशांत शर्मा देखील उपस्थित होते.