Virat Kohli No-ball Controversy: इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) दरम्यान चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या या सामन्यात कोलकाताना बंगळुरुवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. मात्र या सामन्यात एक मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली ज्या बॉलवर बाद झाला त्याने एकच खळबळ उडाली.


का आहे संपूर्ण प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला. विराट कोहली आयपीएलच्या सामन्यात बाद झाल्यावर बराच गदारोळ झाला होता. कोहलीला ज्या चेंडूवर आऊट देण्यात आलं, तो कंबरेच्या वर फेकलेला चेंडू होता. पण तो खरोखर नो-बॉल होता का?


या सामन्यात कोहली समोर कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गोलंदाजी करत होता. राणाने कोहलीला फुल टॉस बॉल टाकला. कोहली हा बॉल खेळला आणि कॅच देऊन बसला. यावेळी अंपायरने त्याला बाद घोषित केलं. कोहलीने रिव्ह्यू घेतला तरी निर्णय बदलला नाही. मात्र, कोहलीला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचे अनेकांना वाटत होतं. 


कोहलीला आऊट करार का देण्यात आला?


जर चेंडू कमरेच्या वर गेला आणि फलंदाज स्ट्राइकवर उभा असेल तर तो नो-बॉल मानला जातो. पण कोहलीच्या बाबतीत असं झालं नाही. टेक्नोलॉजीनुसार, राणाचा बॉल योग्य होता कारण कोहली क्रीजच्या बाहेर उभा होता. चेंडू आणि बॅटची यांच्यातील स्पर्श शरीराच्या खूप पुढे झाला. त्यामुळे हे देखील उघड झालं की, जर कोहली क्रीजच्या आत असता तर चेंडू त्याच्या कमरेपासून 0.92 मीटर उंचीवर आला असता. कोहलीच्या कमरेची उंची 1.04 मीटर आहे. त्यानुसार हा चेंडू नो-बॉल मानता येत नव्हता.



आयसीसीचा नियम काय सांगतो?


ICC चा नियम 41.7 नुसार, जर गोलंदाजाने फलंदाजाच्या कंबरेच्या वर चेंडू टाकला, जो खेळपट्टीवर न पडता टाकला जातो, तर तो नो-बॉल मानला जाईल. पण, या प्रकरणात हा नियम कोहलीच्या बाजूने गेला नाही. 


कोहलीला बसला दंड


कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली संतापला. भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून विराट कोहलीला मोठी शिक्षा सुनावली आहे. विराटला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराटला बीसीसीआयने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. बीसीसीआयने विराटला समज देत आर्थिक दंड ठोठावलाय. विराटला मॅच फीची 50 टक्के रक्कम बीसीसीआयकडे जमा करावी लागणार आहे.