...तर आज महेंद्रसिंग धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो!
एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.
मुंबई : कर्णधार एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जला 8व्या वेळी आयपीएलच्या अंतिम फेरीत फेरीत आणून पोहोचवलं आहे. अगदी अडचणीच्या वेळी तो नेहमीच संघाच्या पाठीशी उभा असतो. क्वालिफायर -1 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी शॉट मारून धोनीने पुन्हा एकदा 'यलो आर्मी'ला ट्रॉफीच्या जवळ आणलंय.
धोनी CSKला देणार गिफ्ट?
15 ऑक्टोबर म्हणजे आज आयपीएलची फायनल रंगणार असून एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जला चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान धोनीची शेवटची आयपीएल असल्याच्या चर्चाही होत आहेत. त्यामुळे निवृत्तीपूर्वी धोनी आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्याची ही अनोखी भेट नक्कीच देईल.
धोनी आज निवृत्ती जाहीर करणार?
जर 'यलो आर्मी' शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अंतिम लढत जिंकली, तर महेंद्रसिंग धोनी अचानक निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पुढच्या आयपीएलमध्ये धोनी रिटेन होणार नाही
पुढील वर्षी आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. सध्याच्या नियमांनुसार, कोणत्याही फ्रँचायझीला लिलावापूर्वी 3 खेळाडू ठेवण्याची परवानगी असेल. जर एमएस धोनीने निवृत्ती घेतली नाही तर सीएसकेला पुन्हा धोनीला किमान 15 कोटी सॅलरी द्यावी लागेल. तर दुसरीकडे यामध्ये अनेक तरूण खेळाडूंना संघात समाविष्ट करता येईल.
नव्या खेळाडूंना संधी देऊ इच्छितो धोनी
जर CSK यावेळी आयपीएल चॅम्पियन बनली, तर धोनीचं ध्येय पूर्ण होईल आणि तो आनंदाने संघाची कमान नवीन खेळाडूकडे सोपवू शकेल. धोनीला त्याला मिळणाऱ्या सॅलरीपासून एक नवीन संघ बनवायचा आहे, जो फ्रँचायझीसाठी नवीन इतिहास लिहिण्यास उपयुक्त ठरेल.