त्रिनिदाद : टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समॅन ऋषभ पंतने (Rishabh Pant) मोठा कारनामा केला आहे. ऋषभने विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 14 धावांची खेळी केली. यासह त्याने आपल्या नावावर विक्रम केला आहे. पंतने वर्षभरात तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 1 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण केलाय.  पंत यासह या वर्षात 1 हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरला. (wi vs ind 1st t20i rishabh pant completed 1 thousand international runs in 1 year across all 3 format)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतला या सामन्याआधी 12 धावांची गरज होती. पंतने 12 वी धाव घेताच ही अनोखी कामगिरी केली. पंतने एकूण 24  सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. पंतने या वर्षात आतापर्यंत 24 सामन्यांमध्ये 3 शतकं आणि 6 अर्धशतकं लगावली आहेत.


विंडिज प्लेइंग इलेव्हन : निकोलस पूरन (कॅप्टन) ,  शामरह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, कायल मेयर्स, अकील हुसेन, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय आणि कीमो पॉल. 


टीम इंडिया प्लेइंग इलेवन - रोहित शर्मा (कर्णधार) , ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन आणि अर्शदीप सिंह.