त्रिनिदाद : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) विंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात (WI vs IND 1st T20I) वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासह रोहित टी 20 मध्ये  सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. रोहितने विंडिज विरुद्धच्या सामन्यात 21 वी धाव घेत हा कारनामा केला आहे. (wi vs ind 1st t20i team india captain rohit sharma break martin guptil most t20i runs world record at trinidad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितला विंडिज विरुद्धच्या या सामन्याआधी 21 धावांची गरज होती. रोहितने 21 वी धाव घेत मार्टिनला मागे टाकलं. रोहितने 129 टी 20 सामन्यांमध्ये  4 शतक आणि 27 अर्धशतकांसह 3 हजार 443 धावा केल्या आहेत. तर मार्टिनच्या नावे 116 सामन्यांमध्ये 2 शतक आणि 20 अर्धशतकांसह 3 हजार 399 धावांची नोंद आहे.


रोहितची शानदार अर्धशतकी खेळी


दरम्यान रोहितने एकूण 44 बॉलमध्ये 145.45 च्या स्ट्राईक रेटसह 64 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 7 शानदार चौकार आणि  2 खणखणीत सिक्स ठोकले. 


विंडिज प्लेइंग इलेव्हन : निकोलस पूरन (कॅप्टन) ,  शामरह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, कायल मेयर्स, अकील हुसेन, ओडियन स्मिथ, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय आणि कीमो पॉल. 


टीम इंडिया प्लेइंग इलेवन - रोहित शर्मा (कर्णधार) , ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन आणि अर्शदीप सिंह.