कोलकाता : भारताचा कसोटी विकेटकीपर वृद्धिमन साहाने माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबाबत मोठे विधान केलेय. भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंना मी कधीही कठोर असल्याचं पाहिलेलं नाहीये, असं विधान साहाने केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच अनिल कुंबळेंनी भारताच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी विराट कोहलीला आपली कार्यशैली पसंत नव्हती असे कुंबळे जाता जाता म्हणाले होते. त्यानंतर आता साहाने कुंबळेंच्या बाजूने विधान केल्याने क्रिकेट जगतात चर्चांना उधाण आलेय.


मला त्यांची पद्धत कधीही कडक शिस्तीची वाटली नाही. एक प्रशिक्षक म्हणून त्यांना कुठे ना कुठे कडक शिस्तीने वागणे गरजेचेचे असते. काहींना ते कठोर वाटले मात्र मला असं कधीच जाणवलं नाही. माझ्या मते अनिल सर प्रशिक्षक असताना कधीही कठोर वाटले नाहीत, असे साहा म्हणाला.


दोन्ही प्रशिक्षकांची तुलना करताना साहा म्हणाला, अनिल भाई ४००, ५०० अथवा ६०० स्कोरसह प्रतिस्पर्धी संघाला १५-२००च्या स्कोरवर ऑलआऊट करण्याबाबतचे लक्ष्य ठेवण्यास सांगत. मात्र हे नेहमी शक्य नाही. तर दुसरीकडे रवी भाई कोणतेही टार्गेट देत नाहीत तर प्रतिस्पर्धी संघाला खेळपट्टीवर टिकण्याआधीच बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे यासाठी आग्रही असतात.