MI vs CSK, IPL 2024 : पाच वेळची चॅम्पियन राहिलेली मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात निराशाजनक कामगिरी करत आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या हंगामात 6 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. तर 4 सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबईची फलंदाजी उत्तम असताना मुंबई गोलंदाजी निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात मुंबई इंडियन्स मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये शेफर्ड आणि हार्दिक पांड्या सारखे ऑलराऊंडर असताना मुंबई (Mumbai Indians) आणखी एका ऑलराऊंडरला संधी देऊ शकते. फास्टर बॉलर आकाश मधवाल (Akash Madhwal) याला यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करता न आल्याने आता त्याच्या जागी अर्जुन तेंडूलकरला (Arjun Tendulkar) संधी दिली जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश मधवालची निराशाजनक कामगिरी


आकाश मधवालने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला सातत्य राखता आलं नाही. आकाशने राजस्थानविरुद्ध 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा देत 3 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या होत्या. मात्र, त्यानंतर दिल्लीविरुद्ध त्याचा चांगला चोप मिळाला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 45 धावा आकाशने खर्च केल्या. तर त्यानंतर आरसीबीविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 57 धावा दिल्या, त्या सामन्यात देखील आकाशला विकेट काढला आली नाही. तर चेन्नईविरुद्ध आकाशने 3 ओव्हरमध्ये 37 धावा दिल्या. डेथ ओव्हरमध्ये आकाशने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही.


अर्जुन तेंडूलकरचं आयपीएल करियर


अर्जुन तेंडुलकरने गेल्या सीझनमध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून चार सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी अर्जुन तेंडुलकरने मागील हंगामात बॅटने फक्त 13 रन्स केले होते. तर गोलंदाजीमध्ये त्याला 3 विकेट घेता आल्या होत्या. अर्जुन सारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी मुंबईने कधीही मागे पुढं पाहिलं नाही. त्यामुळे आता अर्जुनला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, इशान किशन (WK), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (C), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वधेरा, हार्विक देसाई, पियुष चावला, क्वेना मफाका, शम्स मुलानी, ल्यूक वुड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, नुवान तुषारा, अंशुल कंबोज.