Champions Trophy 2025 Hosting Issue : जसाजसा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जवळ येतोय, तसतसं सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याला कारण 9 जूनची मॅच... भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा सामना खेळवला जाणार आहे. या दोन्ही देशात अखेरची लढत भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये झाली होती. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला पाणी पाजलं होतं. अशातच आता भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या वर्षात तगडे सामना पहायला मिळणार आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आणि पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) भिडतील. मात्र, ही चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार असल्याने भारत पाकिस्तानला जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या शेड्यूलवर अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. 2023 मध्ये झालेल्या आशिया कपमधील सामना जसा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायब्रिड मॉडेलनुसार श्रीलंकामध्ये खेळवण्यात आला होता. तसंच आगामी चॅम्पियन ट्रॉफी देखील हायब्रिड मॉडेलवर खेळवणार का? असा प्रश्न विचारला जात होता. त्यातच आता टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नाही, अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.


IANS एजेन्सीला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्विपक्षीय मालिकाच विसरा, टीम इंडिया कदाचित चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा देखील करणार नाहीये. पाकिस्तानकडील वेन्यूमध्ये बदल केले जातील किंवा हायब्रिड मॉडेलवर सामने खेळवले जातील, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांकडून मिळाली आहे.


दरम्यान, भारताने आशिया कपसाठी पाकिस्तानचा दौरा केला नसला तरी पाकिस्तान संघाने वर्ल्ड कपसाठी भारतात खेळणं स्विकारलं. पाकिस्तानी खेळाडू भारतात रमले पण त्यांना वर्ल्ड कपमध्ये खास कामगिरी करता आली नव्हती. मात्र, बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये पाऊलच न ठेवण्याचा निर्णय पक्का केल्याने आता पाकिस्तानला पुन्हा गुडघ्यावर यावं लागणार आहे. 


टीम इंडियाची संभाव्य संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, केएल राहुल.