आर आश्विन भारत-ऑस्ट्रलिया वर्ल्ड कप फायनल खेळणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर Rohit Sharma स्पष्टच म्हणाला...
IND vs AUS World Cup 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात क्रिकेट वर्ल्ड कप २०२३ चा फायनल चा सामना उद्या अहमदाबाद (Ahemdabad) मध्ये रंगणार आहे. त्या आधी पत्रकार परिषदेमध्ये (Press Conference) जेव्हा रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हन आणि आर आश्विनवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, रोहितने प्रामाणिकपणे उत्तर दिलं.
Cricket World Cup 2023 ND vs AUS final : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात होणारी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 च्या फायनल (World Cup 2023) लढतीची उत्सुकता सर्वांना लागली आहे. एका बाजूला स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाच वेळा विजेता झालेला संघ अशा अव्वल टीममध्ये तगडा सामना पहायला मिळणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सध्या अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्रिकेट विश्वचषक फायनलच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) मोठं वक्तव्य केलं आहे.
आश्विन खेळणार का?
पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हन आणि आर आश्विनवर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, रोहितने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. आर आश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार का? असा सवाल रोहितला विचारण्यात आला होता. 'आम्ही यावर निर्णय घेतलेला नाही. आम्ही खेळपट्टीचे मूल्यांकन करू आणि उद्या ठरवू, आमचे 12-13 ठरले आहेत, पण आम्ही आमच्या ताकदीवर विचार करून अंतिम 11 जणं ठरवू, त्यावर उद्या निर्णय घेतला जाईल, असं रोहित शर्माने (Rohit Sharma On R Ashwin) म्हटलं आहे.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी? (Team India Predicted Playing XI)
आम्ही इलेव्हनचा निर्णय घेतलेला नाही. १५ पैकी कोणीही खेळू शकतो. आम्ही विकेटचे मूल्यांकन करून निर्णय घेऊ. आम्हाला विकेट पाहून निर्णय घ्यायचा आहे आणि अर्थातच विरोधी पक्षांची ताकद आणि कमकुवतपणा ठरवायचा आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे. मी गेल्या दहा सामन्यांमध्ये काय केलं यावर माझा विश्वास नाही. हो, त्यामुळे मला आत्मविश्वास घेईन पण संतुलन राखणं महत्त्वाचं आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्याकडे 2011 पासूनचे दोन खेळाडू आहेत जे विश्वचषक फायनलमध्ये सहभागी झाले आहेत. आम्हाला दडपण कसं हाताळायचं हे माहित आहे. आम्ही आम्ही आत्तापर्यंत जसा खेळ केला आहे तसाच पुढेही चालू ठेवायचा आहे, असं म्हणत रोहितने गेम प्लॅन स्पष्ट केला आहे.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : (IND vs AUS Playing XI)
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.