T20 वर्ल्ड कप: भारत सेमीफायनल गाठणार?, `ही` टीम देणार एन्ट्री!
टी-20 वर्ल्डकपमध्ये कालच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा धुव्वा उडवला.
दुबई : टी-20 वर्ल्डकपमध्ये कालच्या सामन्यात टीम इंडियाने स्कॉटलंडचा धुव्वा उडवला. भारताने स्कॉटलंडवर 81 चेंडू राखून 8 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्कॉट्स संघ 17.4 षटकांत 85 धावांत आटोपला. टीम इंडियाला विजयासाठी 86 रन्सचं लक्ष्य मिळालं होतं.
पुन्हा आशा जागल्या
अफगाणिस्तानाच्या मानाने चांगलं रनरेट उभारण्यासाठी भारताला हे लक्ष्य 7.1 ओव्हर्समध्ये गाठायचं होतं. मात्र भारताने हे लक्ष्य 6.3 ओव्हर्समध्येचं पार केलं. 86 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 6.3 ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून 89 धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने 19 चेंडूत 50 रन्स केले आणि रोहित शर्माने 16 चेंडूत 30 रन्स केले.
हा संघ भारताला उपांत्य फेरीत देणार प्रवेश
भारताचं रनरेट आता अफगाणिस्तानपेक्षाही चांगला झालंय. स्कॉटलंडवरील विजयामुळे भारताचा धावगती +1.619 वर गेलंय. पहिल्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानचं रन रेट देखील +1.065 आहे. रविवारी न्यूझीलंडशी सामना करणाऱ्या अफगाणिस्तानवर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा आहेत. अफगाणिस्तानच्या विजयानंतर भारताला नामिबियाचा मोठ्या फरकाने पराभव करावा लागला आहे. मात्र, न्यूझीलंडचा विजय भारताला स्पर्धेतून बाहेर काढेल.
भारत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात
कालच्या सामन्यात राहुलची फलंदाजी पाहून असं वाटलं की, भारत सेमीफायनल गाठण्याच्या प्रयत्नात आहे. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत स्कॉटलंडचा डाव 17.4 ओव्हर्समध्ये 85 धावांत गुंडाळला.