Rohit Sharma: अखेर रोहित शर्मा MI सोडणार? हार्दिकच्या `या` कृत्यांना वैतागल्याची चर्चा
IPL 2024: आता एका अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स टीममध्ये खूश नाही. यावेळी सिझनच्या समाप्तीनंतर तो एमआय फ्रँचायझी सोडू शकतो.
IPL 2024: यंदाची आयपीएल सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडिन्सच्या टीममध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. टीम मॅनेजमेंटने रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला टीमचं कर्णधारपद सोपवलं. यानंतर रोहित शर्माचे चाहते मात्र चांगलेच नाराज झाले होते. दरम्यान आयपीएल सुरु झाल्यानंतर देखील हार्दिक आणि रोहित दोघांचं एकमेकांशी पटत नसल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. अशातच आता रोहित शर्मा यंदाच्या सिझननंतर मुंबई इंडियन्स सोडणार असा दावा केला जातोय.
आता एका अहवालात एक मोठा खुलासा झाला आहे की, रोहित शर्मा मुंबई इंडियन्स टीममध्ये खूश नाही. यावेळी सिझनच्या समाप्तीनंतर तो एमआय फ्रँचायझी सोडू शकतो. आतापर्यंत अहमदाबाद, हैदराबाद आणि मुंबईच्या होम ग्राउंड वानखेडेवरही प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. MI ने आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावल्यामुळे त्याच्या खराब कर्णधारपदासाठी हार्दिकवर अधिकच टीका करण्यात येतेय.
रोहित शर्मा MI सोडणार का?
एका अहवालानुसार, रोहित शर्मा सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या सिझननंतर MI फ्रँचायझी सोडू शकतो. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर रोहित अजिबात खूश नसल्याचं म्हटलं जातंय. रोहितला हार्दिकची कॅप्टन्सी अजिबात आवडत नाही. हे या मतभेदाचं मुख्य कारण असल्याचे समोर आलंय.
रोहित शर्माला पुन्हा मिळणार का कर्णधारपद?
रिपोर्टनुसार, रोहित शर्माला पुन्हा कर्णधार बनवण्याचा विचार केला जातोय. मात्र हा मोठा निर्णय घेण्यापूर्वी हार्दिक पांड्याला आणखी संधी दिली जाऊ शकतात. त्यामुळे रोहितला पुन्हा कर्णधारपद मिळण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे.
सूर्यकुमार यादवचं होणार कमबॅक?
मुंबई इंडियन्ससाठी सर्वकाही बिघडलं असतानाच कर्णधार हार्दिक पांड्यासाठी पहिली खुशखबर समोर आलीये. दुखापतीमुळे बाहेर असलेला टी-20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) तंदरुस्त झाला आहे. लवकरच तो मुंबई इंडियन्स टीममध्ये परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने सूर्यकुमार यादव पूर्णपणे तंदरुस्त झाल्याचं जाहीर केलं आहे. स्पोर्ट हार्नियावरच्या शस्त्रक्रियानंतर सूर्यकुमार यादव फीटनेसवर काम करत होता.