Indian vs Pakistan Bilateral series: गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान ( Indian vs Pakistan ) यांच्यामध्ये कोणतीही सिरीज खेळली गेलेली नाही. सीमेवरील सतत तणावाचा परिणाम क्रिकेटवरही होताना दिसतोय. भारत आणि पाकिस्तान ( Indian vs Pakistan ) यांच्यातील शेवटची मालिका (IND vs PAK) 2012-13 मध्ये खेळली गेली होती. जेव्हा पाकिस्तानने भारताचा दौरा केला आणि दोन्ही संघांमध्ये 2 T20 आणि 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळली गेली. त्यानंतर केवळ प्रत्येक आयसीसी स्पर्धेत दोन्ही टीम्स आमने-सामने येताना दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny ) आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिलीये. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीज पुन्हा सुरू करता येईल का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय. दरम्यान याचं उत्तर खुद्द रॉजर बिन्नीने दिलंय.


BCCI अध्यक्ष-उपाध्यक्षांचा पाकिस्तान दौरा


बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ( Roger Binny ) यांचं असं मत आहे की, क्रिकेट दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी फायदेशीर ठरी शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निमंत्रणावरून रॉजर बिन्नी आणि शुक्ला आशिया कपचे सामने पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. 17 वर्षात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. यानंतर बीसीसीआयचे दोन्ही अधिकारी बुधवारी अटारी वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले. 


भारत-पाकमध्ये पुन्हा सिरीज होणार सुरु?


भारत आणि पाकिस्तान ( Indian vs Pakistan ) यांच्यातील राजकीय तणावामुळे दोन्ही देश फक्त आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिरीजबाबत विचारलं असता, बीसीसीआय अध्यक्ष बिन्नी म्हणाले, यासंदर्भात मी निर्णय घेऊ शकत नाही. हा सरकारचा मुद्दा असून त्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र माझी अशी आशा आहे की, असं होईल. याचं कारण म्हणजे आता वनडे वर्ल्डकप होणार आहे आणि पाकिस्तानची टीम भारतात सामने खेळणार आहे.


पाहुणचाराने बीसीसीआय अध्यक्ष भारावले


पाकिस्तान टीमने केलेल्या पाहुणारचाराबाबत बिन्नी म्हणाले, 'आम्ही पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याठिकाणी आमचा चांगला पाहुणचार झाला. क्रिकेट सामना पाहणं आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा आमचा मुख्य अजेंडा होता. एकूणच हा दौरा अप्रतिम झाला. 


राजीव शुक्ला यांनी सांगितलं की 'आमची भेट खूप चांगली झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आमची योग्य ती चांगली काळजी घेतली. सुरक्षा व्यवस्था अतिशय कडेकोट होती.