आयपीएल टीम हे खेळाडू कायम ठेवणार?
आयपीएलच्या टीमना त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर करायची आहे.
मुंबई : आयपीएलच्या टीमना त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर करायची आहे. थोड्याच वेळामध्ये टीमनं किती आणि कोणते खेळाडू रिटेन केले याचं चित्र स्पष्ट होईल. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही खेळाडूंची यादी समोर आली आहे.
हे खेळाडू कायम राहणार?
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या
सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार
कोलकाता नाईटरायडर्स : मनीष पांडे, आंद्रे रसेल, सुनिल नारायण
राजस्थान रॉयल्स : स्टिव्ह स्मिथ, अजिंक्य रहाणे
चेन्नई सुपरकिंग्ज : सुरेश रैना, एम.एस.धोनी, रविंद्र जडेजा
दिल्ली डेअरडेव्हिल्स : श्रेयस अय्यर, रिशभ पंत
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर, हाशीम आमला, ग्लेन मॅक्सवेल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर : विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, के.एल. राहुल
चेन्नई-राजस्थानचं कमबॅक
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई आणि राजस्थानच्या टीमचं कमबॅक होणार आहे. या दोन्ही टीमना दोनवर्षांपूर्वी त्यांच्या टीमकडून खेळलेले आणि नंतर पुणे किंवा गुजरातकडून खेळलेल्या खेळाडूंनाच कायम ठेवता येणार आहे.
एवढे खेळाडू टीममध्ये ठेवता येणार
आयपीएलच्या टीमना जास्तीत जास्त ३ खेळाडू कायम राखता येतील. आणि आयपीएल लिलावावेळी दोन खेळाडूंना राईट टू मॅच कार्डचा वापर करून पुन्हा एकदा टीममध्ये घेता येईल.
राईट टू मॅच कार्ड म्हणजे काय?
मुंबई इंडियन्सनं पोलार्डला टीममध्ये कायम ठेवलं नाही तर त्याला आयपीएलच्या लिलावाला सामोरं जावं लागेल. या लिलावामध्ये चेन्नई सुपरकिंग्जनं पोलार्डला ८ कोटी रुपयांना विकत घेतलं तर मुंबई इंडियन्स राईट टू मॅच कार्डचा वापर करून पुन्हा पोलार्डला टीममध्ये घेऊ शकतं.