मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यातील मतभेद बुधवारी सर्वांसमोर आले. भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराट कोहलीने सांगितलं की, त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी संघ (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका) जाहीर होण्याच्या दीड तास आधी सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी कर्णधार विराट कोहलीने बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुलीचे विधान जाहीरपणे नाकारलं. दरम्यान सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याशी झालेला वाद सर्वश्रुत होता. झिम्बाब्वेमध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर गांगुलीला 2005 मध्ये कर्णधारपदावरून वगळण्यात आलं होते. त्याला कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्यावेळी दिवंगत जगमोहन दालमिया यांना मंडळाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं.


कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचं मोठं नुकसान


बोर्डाच्या एका प्रशासकाने सांगितलं की, “बीसीसीआयसाठी हे खूप कठीण आहे. जर बोर्डाने विधान जारी केलं तर कर्णधार खोटे सिद्ध होईल आणि निवेदन दिले नाही तर अध्यक्षांवर प्रश्न निर्माण होतील. कोहलीच्या वक्तव्यामुळे बोर्डाचे बरंच नुकसान झालं आहे. 


बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, एका वरिष्ठाने दावा केला की, कोहलीला टी-20 कर्णधार सोडणं योग्य आहे का, असं विचारलं असता त्यात नऊ जणांचा समावेश होता. यामध्ये अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे.


विराटने गांगुलीचं वक्तव्य फेटाळलं


गांगुलीच्या वक्तव्यावर अगदी उलट माहिती देताना भारतीय कर्णधार म्हणाला, “मी टी-20 कर्णधारपद का सोडू इच्छितो याची कारणे दिली आणि माझा दृष्टिकोन चांगला समजला. काहीही चुकीचे नव्हतं, कोणताही संकोच नव्हता आणि एकदाही असं म्हटले गेलं नाही की तू T20 चे कर्णधारपद सोडू नकोस."