कोलंबो : श्रीलंकेने दोन दिवस आधी न्यूझीलंडला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ६ विकेटने हरवलं. पण या विजयानंतर श्रीलंकेच्या टीमला जोरदार झटका लागला आहे. श्रीलंकेचा स्पिनर अकिला धनंजयाची बॉलिंग ऍक्शन संशयास्पद असल्याचा आरोप झाला आङे. धनंजयाबरोबरच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याच्या बॉलिंग ऍक्शनवरही आक्षेप घेण्यात आळे आहेत. या दोन्ही टीममधली दुसरी टेस्ट गुरुवारपासून सुरु होईल. यानंतर ३ मॅचच्या टी-२० सीरिजला सुरुवात होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५ वर्षांच्या अकिला धनंजयाने ६ टेस्टमध्ये २९ विकेट, ३६ वनडेमध्ये ३७ विकेट आणि १९ टी-२० मध्ये ६ विकेट घेतल्या आहेत. तर केन विलियमसन हा काळजीवाहू बॉलर आहे. विलियमसनने ७३ टेस्टमध्ये ३३ विकेट, १४९ वनडेमध्ये ५१ विकेट आणि ५७ टी-२०मध्ये १६ विकेट घेतल्या आहेत.


अकिला धनंजया आणि केन विलियमसन यांच्या बॉलिंग ऍक्शनची माहिती अधिकाऱ्यांनी आयसीसीला सोपवली आहे. यामध्ये दोघांच्या बॉलिंग ऍक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अकिला धनंजया याने पहिल्या टेस्टमध्ये श्रीलंकेला जिंकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धनंजयाने पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट घेतल्या. तर केन विलियमसनने या मॅचमध्ये फक्त ३ ओव्हर टाकल्या.


विलियमसन आणि धनंजया यांना बॉलिंग ऍक्शनची तक्रार झाल्यानंतर १४ दिवसात चाचणी द्यावी लागणार आहे. तोपर्यंत दोन्ही खेळाडू बॉलिंग करू शकतात. दोन्ही टीममधली दुसरी टेस्ट गुरुवारपासून सुरु होणार आहे.


अकिला धनंजयावर एका वर्षात दुसऱ्यांदा संशयास्पद बॉलिंग ऍक्शनचे आरोप झाले आहेत. डिसेंबर २०१८ साली धनंजयाची बॉलिंग थांबवण्यात आली होती. बॉलिंग ऍक्शनमध्ये बदल करुन धनंजयाने पुनरागमन केलं, पण यानंतर वनडेमध्ये धनंजयाच्या कामगिरीवर परिणाम झाला. त्यामुळे वर्ल्ड कपच्या टीममध्येही त्याची निवड झाली नाही.