Video : विम्बल्डन स्पर्धेतील एक भावूक क्षण, तुम्हीही याचे कौतुक कराल, पाहा
Wimbledon 2021 : तब्बल एका वर्षानंतर विम्बल्डन (Wimbledon ) स्पर्धा सुरु झाली. दरम्यान, स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच एका महिलेवर कॅमेरा रोखला गेला.
मुंबई : Wimbledon 2021 : तब्बल एका वर्षानंतर विम्बल्डन (Wimbledon ) स्पर्धा सुरु झाली. दरम्यान, स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच एका महिलेवर कॅमेरा रोखला गेला. उपस्थित प्रेक्षकांना काही समजले नाही. मात्र, ज्यावेळी या महिलेचे नाव आणि त्यांचे काम ऐकल्यावर प्रेक्षकांना विशेष आनंद झाला. आज आपण त्यांच्यामुळे ही स्पर्धा पाहत आहोत, याची जाणीव झाली आणि टाळ्या वाजवत पूर्ण प्रेक्षक गॅलरीत अभिवादनासाठी ते उभे राहिले. हा भावूक क्षण कॅमेऱ्यात चित्रित झाला.
विम्बल्डन स्पर्धेच्यावेळी रॉयल बॉक्समध्ये कोरोना लस विकसित करणारे आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या संशोधकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी सामन्यादरम्यान एका महिलेवर कॅमेरा रोखला गेला. त्यावेळी सर्व प्रेक्षकांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, या महिला म्हणजे सामान्य वायरोलॉजिस्ट सारा गिल्बर्ड होत्या. सारा गिल्बर्ट यांनी ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनका कोरोना लस (oxford AstraZeneca Vaccine coronavirus vaccine) विकसित केली होती. त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रेक्षकांनी उभे राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. विम्बल्डनच्या आयोजकांनी यावर्षी सुरुवातीचे सामने पाहण्यासाठी एनएचएस स्टाफ आणि कोरोना विषाणूची लस विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांना व्हीआयपी रॉयल बॉक्समध्ये बसून सामने पाहण्यासाठी निमंत्रिक केले होते.
यादरम्यान सारा गिल्बर्ड यादेखील सामना पाहण्यासाठी पोहोचल्या. नोवाक जोकोव्हीच जेव्हा ब्रिटनचा खेळाडू जॅक ड्रॅपर याला सर्व्हिस करत होता, त्याच वेळी लाऊडस्पीकरवर एक अनाऊंसमेंट करण्यात आली. रॉयल बॉक्समध्ये कोरोना लस विकसित करणारे आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे संशोधक बसले आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली आणि एक मिनिट उभे राहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच हा एक भावूक क्षण असल्याचे कॉमेंट्री करत असलेल्या बोरिस बेकरने म्हटले.