कोल्हापूर : राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम सामन्यापूर्वी अर्धा तास आधी शिवचरित्र वाचल्यानं मनावरचं दडपण खुप कमी झाल्याचं महाराष्ट्राची नेमबाज तेजस्विनी सावंत हिनं सांगितलं. नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं 50मी रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक तर 50मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीला पुस्तक वाचायची आवड असून या स्पर्धेला ती शिवचरित्र घेऊन गेली होती. मनावरील दडपण कमी करण्यासाठी तिनं या स्पर्धे दरम्यान शिवचरित्र वाचल्याचं 'झी 24 तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं आहे.


पाहा तेजस्विनीची मुलाखत