Rohit Sharma : थाळीत सजवून वर्ल्डकप मिळत नाही...; वर्ल्डकप जिंकण्याच्या प्रश्नावर संतापला हिटमॅन?
Rohit Sharma : भारतात होणारा हा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) जिंकण्याचा टीम इंडिया ( Team India ) पूर्ण प्रयत्न करणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आगामी वर्ल्डकप जिंकण्यासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलंय.
Rohit Sharma : यंदाचा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) फार खास आहे, कारण 2011 नंतर वनडे वर्ल्डकपचं भारतात आयोजन केलं जाणार आहे. भारतात होणारा हा वर्ल्डकप ( World Cup 2023 ) जिंकण्याचा टीम इंडिया ( Team India ) पूर्ण प्रयत्न करणार आहे. अशातच कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आगामी वर्ल्डकप जिंकण्यासाठी उत्सुक असल्याचं त्याने म्हटलंय. दरम्यान मीडियाशी बोलताना रोहित म्हणाला की, खरं सांगायचं तर वनडे वर्ल्डकप मी कधी जिंकलेला नाही. त्यामुळे वर्ल्डकप जिंकणं हे एक स्वप्न आहे.
'वर्ल्डकप थाळीत सजवून मिळत नाही'
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला की, वर्ल्डकप तुम्हाला थाळीमध्ये सजवून मिळत नाही, तो जिंकण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. 2011 पासून इतकी वर्ष आम्ही यासाठीच प्रयत्न करतोय. मैदानावर उतरून वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. आम्हाला एक गोष्ट माहितीये ती म्हणजे, आमच्याकडे सर्वात चांगली टीम आहे.
टीममध्ये असलेले सर्व खेळाडू चांगले आहे. मुख्य म्हणजे आमच्याकडे आत्मविश्वास आहे की, आम्ही हे करू शकतो. 2022 च्या वर्ल्डकपमध्ये आम्ही पराभूत झालो त्यावेळी पुढच्या वर्ल्डकपसाठी आम्ही आव्हान देऊ असं मी म्हटलं असल्याचंही, टीमचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) ने म्हटलंय.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होणार होती आणि मी म्हणालो की आम्ही त्यासाठी लढत राहू. टीमचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, पण माझं मुख्य काम एक फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करणं आहे. मला प्रथम फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करावी लागेल. त्यानंतर कर्णधारपदाची भूमिका येते. पहिल्यांदा मला मोठी खेळी खेळायची आहे, असंही रोहितने सांगितलंय.
टी-20 न खेळण्याबाबत काय म्हणाला रोहित?
टी-20 मध्ये न खेळण्याबाबत रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला की, हे वर्ल्डकपचं वर्ष असल्याने सर्वांना ताजेतवाने ठेवायचंय. आधीच आमच्या टीममध्ये अनेकाजण दुखापतग्रस्त आहेत. आता मला दुखापतींची भीती वाटते.
सूर्यकुमारसारख्या खेळाडूला अतिरिक्त सामन्यांमध्ये संधी देणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने त्याने यंदाच्या आयपीएलला सुरुवात केली ती पाहा. कारण त्याला लय गवसणे आणि आत्मविश्वास वाटणे संघाच्या दृष्टीने फायद्याचं आहे. पहिल्या 4-5 सामन्यांमध्ये त्याला फारशा धावा करता आल्या नाहीत. मात्र नंतर त्याने काय केलं पाहा," असं रोहितने सूर्यकुमारची पाठराखण करताना म्हटलंय.