मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) अवघ्या काही तासांमध्ये सुरुवात होतेय. यंदाच्या मोसमापासून एकूण 10 संघ आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना थरार आणि रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. आयपीएलच्या 15 व्या मोसमाचा श्रीगणेशा होण्यासाठी काही तास शिल्लक असताना बीसीसीआयने (Bcci) क्रिकेट चाहत्यांना गूड देण्याचा प्रयत्न केलाय. (wipl bcci may be  positive to organize womens ipl 2023)
  
बीसीसीआय  पुढील वर्षात महिला आयपीएल (Womens Ipl) स्पर्धेचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. शुक्रवारी आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलची बैठक पार पडली. या बैठकीत 2023 पासून 6 संघ समाविष्ठ असलेल्या महिला आयपीएल स्पर्धेला सुरु करण्याबाबत प्रयत्न केले जातील, अशी चर्चा झाली. मात्र या वर्षी वूमन्स टी 20 चॅलेन्ज स्पर्धेचे सामने पार पडतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय अध्यक्ष काय म्हणाले? 


महिला आयपीएलबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने याबाबती अधिक माहिती दिली. "वार्षिक सर्वसाधारण बैठकीत महिला आयपीएलला परवानगी मिळणं बाकी आहे. आम्ही महिला आयपीएल 2023 ला खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत", असं गांगुलीने नमूद केलं.


आयपीएलचे चेयरमन काय म्हणाले? 


"महिला आयपीएलच्या आयोजनच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यावर्षी तीन संघांमध्ये चार सामने खेळवले जातील, जे आयपीएल प्लेऑफच्या वेळी होणार आहेत. या सर्व सामन्यांचं आयोजन हे पुण्यात करण्यात येईल", अशी माहिती आयपीएल चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली.  


गेल्या वर्षी कोरोनामुळे या सामन्यांचं आयोजन करता आलं नाही. अखेरच्या महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेचं आयोजन हे 2022 मध्ये यूएईत करण्यात आलं होतं. 


महिला  स्पर्धेत ट्रेलब्लेजर्स,  व्हेलोलसिटी आणि सुपरनोव्हाज अशा 3 टीम खेळतात. सुपरनोव्हाजने सलग 2018 आणि 2019 मध्येविजेतेपद पटकावलं होतं. यानंतर ट्रेलब्लेजर्सने पहिल्यांदा 2020 मध्ये विजेतपद पटकावलं. मात्र यानंतर 2021 मध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नाही.