Ind vs Aus t20 : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील टी-20 मालिकेमध्ये महिला भारतीय संघाचा पाचव्या सामन्यातही पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिका 4-1 ने विजयी खिशात घातली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 197 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतीय संघाचा डाव 142 धावांवर आटोपला. (women australia beat women india cricket latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 ओव्हरपर्यंत 67 धावांवर रोखलं होतं. मात्र इतर सामन्यांप्रमाणे ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी अष्टपैलू ऍश्ले गार्डनरने 32 चेंडूत नाबाद 66 धावा आणि ग्रेस हॅरिसने 35 चेंडूत नाबाद 64 धावा करत संघाला जवळपास 200 च्या जवळपास मजल मारून दिली.


वेगवान गोलंदाजांना मिडल ऑर्डरच्या विकेट्स न घेता येणं हेच पूर्ण मालिकेतील पराभवाचं कारण ठरलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना सुरूवातीला मोठी खेळी करण्यात आजही अपयश आलं. ऑस्ट्रेलियाची युवा गोलंदाज हीदर ग्रॅहमने हॅट्रिक घेत सर्वाधिक 4 विकेट्स् घेतल्या.  


दरम्यान, मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसरा सामना टाय झाला. भारताचा आत्मविश्वास वाढला मात्र त्यानंतर सलग तीन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऍश्ले गार्डनरने या संपूर्ण मालिकेत शानदार प्रदर्शन केल्याने तिला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं.