भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर संजय मांजरेकर आपल्या एका विधानामुळे टीकेचा धनी झाला आहे. महिला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिला सामना पार पडला. या सामन्यात संजय मांजरेकरांनी समालोचन करताना केलेल्या विधानामुळे त्याच्यावर वर्षद्वेषी असल्याची टीका होत आहे. उत्तर भारतातील खेळाडूंची आपल्याला सखोल माहिती नाही असं संजय मांजरेकरने म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांजरेकर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग युनिटबद्दल बोलत असताना हे घडलं. त्याचा सहकारी समालोचक पंजाबचा माजी खेळाडू आणि संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांच्याबद्दल बोलत होता. तेव्हा मांजरेकरने आपण त्यांना ओळखण्यात अपयशी ठरल्याचं मान्य केलं. 


'खरंच चूक कोणाची आहे?', हरमनप्रीतने अम्पायरशी वाद घातल्यानंतर आर अश्विनने विचारला प्रश्न, नंतर डिलीट केली पोस्ट


 


संजय मांजरेकर म्हणाला की, "माफ करा, मी त्याला ओळखलं नाही. उत्तरेच्या खेळाडूंकडे माझं जास्त लक्ष नसतं". संजय मांजरेकचं हे विधान नेटकऱ्यांना फारच आवडलं नाही. यानंतर सोशळ मीडियावर त्याला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. 



पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव


भारतीय महिला क्रिकेट संघाला (Indian Women Cricket Team) टी-20 वर्ल्डकपमध्ये  (T20 World Cup) अपेक्षित सुरुवात मिळालेली नाही. दुबईत झालेल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 58 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 160 धावा केल्या होत्या. कर्णधार सोफीने नाबाद 57 धावा ठोकल्या. पण भारतीय संघ फक्त 102 धावांवर ऑल आऊट झाला. रोजमेरीने 4 विकेट्स घेतल्या.





14 व्या ओव्हरमध्ये वाद


14 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर एक वाद झाला. न्यूझीलंडच्या केरने लाँग ऑफला चेंडू टोलावला आणि एक धाव काढली. हरमनप्रीत कौरने चेंडू अडवला होता. एकीकडे ओव्हर संपलेली असल्याने हरमनप्रीतला चेंडू डेड आहे असं वाटलं, तर दुसरीकडे केरने दुसऱ्या रनसाठी धाव घेतली. पण तो पूर्ण करण्याआधी ती रन आऊट झाली. पण तोपर्यंत अम्पायर्सनी टोपी दिप्ती शर्माकडे दिली होती आणि ओव्हर पूर्ण झाल्याचं जाहीर केलं होतं. 


भारतीय संघाने रन-आऊटसाठी अपील केली होती आणि दुसरीकडे केरनेही डग-आऊटच्या दिशने चालण्यास सुरुवात केली होती. पण अम्पायर्सनी ओव्हर संपली असल्याने ही धाव अयोग्य होती असं सांगत तिला नाबाद जाहीर केलं.