पराभवानंतरही महिला संघाने जिंकलं प्रत्येकाचं मन
भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हार झाली असली, तरी पूर्ण क्रिकेट संघाची स्तुती सगळेच भारतीय करत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन केलं आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट म्हटलं आहे की, तुम्ही भलेही हरला असलात तरी तुमची कामगिरी उत्तम होती. भारतीय स्त्री जिंदाबाद!
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात हार झाली असली, तरी पूर्ण क्रिकेट संघाची स्तुती सगळेच भारतीय करत आहे. बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी देखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांचं अभिनंदन केले. महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर म्हटलं, तुम्ही भलेही हरला असलात तरी तुमची कामगिरी उत्तम होती. भारतीय स्त्री जिंदाबाद!
अभिनेता शाहरुख खानने ही ट्विटवर म्हटलं, महिला संघाने जे काही प्राप्त केले त्यावर आम्हाला गर्व आहे. याच महिला क्रिकेट संघाने संपूर्ण देशाला अभिमानाची एक संधी दिली.
तर भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहन देऊन अभिनेत्री अनुष्का शर्माने म्हटले आहे की, तुमच्या दृढ निश्चय आणि कर्तुत्वाला सलाम. नशीबाने जरी साथ दिली नसली तरी पण तुम्ही प्रत्येकाचे मन जिंकलंय.
तसेच अभिनेते बोमन इरानी यांनी म्हटले, पाहण्यासाठी हे खूपच कठीण होते, पण सगळ्याच मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. आम्हाला आता पण तुमचा अभिमान आहे.
इंग्लंडने भारताला नऊ धावांनी पराभूत करून चौथ्यांदा विश्वचषक जिंकले. भारतीय संघ ४८.४ ओवरमध्ये २१९ धावांवर सर्व बाद झाले.