काकामिघारा : महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत चांगली कामगिरी करत चीनचा बदला घेतला आणि हॉकी चषकावर आपले नाव कोरले आहे. भारताने ५-४ ने चीनचा पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 २००९मध्ये झालेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात चीनने भारताचा ५-३ असा पराभव केला होता. आजच्या अंतिम सामन्यात भारतीय टीमने चीनचा बदला घेण्याची संधी सोडली नाही. भारतीय महिलांनी पेनल्टीच्या जोरावर ही लढत जिंकली. 


जपानच्या काकामिघारा येथे ही स्पर्धा सुरु होती. भारताच्या महिलांनी चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली.  उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने गतविजेत्या आणि यजमान जपानचा ४-२ अशा गोलने पराभव केला होता.