मुंबई : आयपीएलच्या धर्तीवरच आता महिला खेळाडूंसाठी देखील आयपीएल सूरू करण्यात आले आहे. या आयपीएलला   Women's T20 Challenge असेही म्हटले आहे. महिलांचे ही आयपीएल उद्यापासून सूरु होणार आहे. यामध्ये किती संघ असणार आहेत ? कशा लढती होणार आहेत हे पाहूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला स्पर्धेत ट्रेलब्लेजर्स,  व्हेलोलसिटी आणि सुपरनोव्हाज अशा 3 टीम खेळतात. सुपरनोव्हाजने सलग 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद पटकावलं होतं. यानंतर ट्रेलब्लेजर्सने पहिल्यांदा 2020 मध्ये विजेतपद पटकावलं. मात्र यानंतर 2021 मध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खबरदारी म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नाही.कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर यावर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 23 मे पासून या स्पर्धेला सुरूवात होत आहे. 


महिला टी 20 चॅलेंज 2022 साठी तिन्ही संघ


सुपरनोव्हाज : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), तानिया भाटिया, एलाना किंग, आयुषी सोनी, चंदू वी, डिएंड्रा डॉटिन, हरलीन देओल, मेघना सिंह, मोनिका पटेल, मुस्कान मलिक, पूजा वस्त्राकर, प्रिया पुनिया, राशि कनौजिया, सोफी एक्लेस्टोन, सुने लुस आणि मानसी जोशी. 


ट्रेलब्लॅझर्श : स्मृती मंधाना (कर्णधार), पूनम यादव, अरुंधति रेड्डी, हॅली मैथ्यूज, जेम्मिाह रोड्रिग्स, प्रियंका प्रियदर्शिनी, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह, ऋचा घोष, एस मेघना, सैका इशाक, सलमा खातून, शर्मिन अख्तर, सोफिया ब्राउन, सुजाता मलिक आणि एसबी पोखरकर. 


व्हेलॉसिटी  : दीप्ती शर्मा (कॅप्टन), स्नेह राणा, शैफाली वर्मा, अयाबोंगा खाका, केपी नवगीर, कॅथरीन क्रॉस, कीर्ती जेम्स, लौरा वोल्वार्ड्ट, माया सोनवणे, नत्थाकन चंतम, राधा यादव, आरती केदार, शिवली शिंदे, सिमरन बहादुर, यास्तिका भाटिया आणि प्रणवी चंद्रा.


सामन्याचं वेळापत्रक
23 मे- संध्याकाळी 7:30 वाजता – ट्रेलब्लॅझर्श  विरुद्ध सुपरनोवाज 


24 मे- दुपारी 3:30 वाजता – सुपरनोवाज विरुद्ध व्हेलॉसिटी


26 मे- संध्याकाली 7:30 वाजता – व्हेलॉसिटी विरुद्ध ट्रेलब्लॅझर्श


28 मे- संध्याकाळी 7:30 वाजता – अंतिम सामना