मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना भारती महिला क्रिकेट संघाने चमकदार कामगिरी केली. सेमीफायनलमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. आता फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाचा सामना आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या या पाच महत्वाच्या खेळाडू आहेत की, त्यांच्या जीवावर भारत विश्व चषक जिंकू शकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करत टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली. त्यानंतर टीम  इंडियावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.  २३ जुलैला अंतिम सामना होत आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम सामन्यात कोण चांगला खेळ करेल याची उत्सुकता आहे. टीम इंडियात अशा पाच खेळाडू आहेत की, त्यांच्याच जीवावर महिला क्रिकेट विश्व चषक जिंकू शकेल. यात वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा,  मिताली राज, हरमनप्रीत कौर, एकता बिष्ट यांचा समावेश आहे.


वेदा कृष्णमूर्ती - हिने ५ सामन्यात ११८ धावा बनविल्यात. तिने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना ४५ चेंडूत ७० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तिचा स्ट्राइक रेट १५५.५५ आहे. तिने ७ चौके आणि २ सिक्स मारलेत. तर सेमी फायनलमध्ये तिने १० चेंडूत १६ धावा बविल्यात. तिचा खेळ उंचावलाय. ती अंतिम सामन्यात चमक दाखवू शकते. तिच्यावर जास्त विश्वास आहे.


दीप्ती शर्मा - ही अष्टपैलू खेळाडू आहे. दीप्तीने ८ सामन्यात ७ इनिंगमध्ये २०२ धावा काढल्यात. तिची वैयक्तिक ७८ धाव संख्या आहे. दीप्तीने या स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली आहेत. तसेच गोलंदाजीचा विचार केला तर ती चौथ्या स्थानावर आहे. ४.५७च्या इकॉनॉमी रेटनुसार १२ विकेट घेतल्यात. तिने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या  ३ विकेट घेतल्यात.


मिताली राज - टीम इंडियाची कर्णधार. तिने या विश्व चषक स्पर्धेत महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविल्यात. तिने ६००० पेक्षा अधिक धावा केल्यात. ती पहिली महिला क्रिकेटर आहे. ती १८ वर्षांपासून एक महत्वाची भूमिका बजावत आहे. ८ सामन्यात तीने ३९२ धावा केल्यात. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये ३६ धावा केल्यात. फायनलमध्ये चांगले प्रदर्शन करील अशी आशा आहे.


हरमनप्रीत कौर - सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाची फिसे काढताना नाबाद १७१ धावांची मोठी खेळी केली.  तिने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चांगलीच धूळ चारली. तिने ११५ चेंडूत २० चौके आणि ७ षटकार ठोकत मोठी खेळी केली. तिला प्लेअर ऑफ मॅच म्हणून गौरविले गेले. रविवारी होणाऱ्या फायनलमध्ये तिच्यावर मोठी जबाबदारी असेल.


एकता बिष्ट - टीम इंडियातील महत्वाची फिरकी गोलंदाज आहे. एकता विष्टने विश्व चषकमध्ये पाकिस्तान विरुद्ध चांगले प्रदर्शन केले. तिने ५ विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. ३१ वर्षीय एकता सहा सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिच्या ऐवजी राजेश्वरी गायकवाडला संधी देण्यात आली. राजेश्वरीने न्यूझीलंडविरुद्ध खेळाताना ५ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे एकता ऐवजी तिला संधी देण्यात आली होती. मात्र, सेमी फायनलमध्ये केवळ १ विकेट तिने घेतली. त्यामुळे एकतावर टीम इंडियाचा जास्त विश्वास दिसत आहे.