Women`s World Cup : ऑस्ट्रेलिया टीमचा विजयी रथ रोखणार? भारतीय महिलांची उत्तम फलंदाजी
महिला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखू शकणार का हे राहणं महत्त्वाचं आहे.
न्यूझीलंड : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. महिला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ रोखू शकणार का हे राहणं महत्त्वाचं आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 278 रन्सचं तगडं आव्हान दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लानिंग हिने टॉस जिंकून प्रथन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भारतीय महिला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरल्या. आजच्या सामन्यासाठी शेफाली वर्माचा टीममध्ये समावेश केला होता. मात्र अवघ्या 12 रन्सवर शेफाली माघारी परतली. स्मृती मंधानाकडून अपेक्षा असताना ती देखील केवळ 10 रन्सवर आऊट झाली.
3 जणींची अर्धशतकं
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात यास्तिका भाटीया, मिताली राज आणि हरमनप्रित कौर यांनी अर्धशतकं झळकावली आहेत. यास्तिकाने 83 बॉल्समध्ये 59, मितालीने 96 बॉल्समध्ये 68 तर कौरने 47 बॉल्समध्ये 57 रन्स करत टीमला 200 रन्स पार करण्यास मदत केली.
झुलन गोस्वामीचा नवा रेकॉर्ड
आजच्या सामन्यात झुलनने अजून एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. झुन 200 वनडे सामने खेळणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर बनली आहे. यापूर्वी भारताचीच मिताली राज हिने हा रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर आता या यादीमध्ये झुलनचं नावंही जोडलं गेलंय.