ग्लासगो : बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि बी.साईप्रणीत यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किदाम्बी श्रीकांतने फ्रान्सट्आ लुकास कॉर्वीला २१-९, २१-१७ असे सहज हरवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेशकेला. दोन्ही गेममध्ये श्रीकांतचा खेळ वरचढ दिसला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने प्रतिस्पर्ध्याला वरचढ होण्याची अजिबात संधी दिली नाही. 


दुसऱ्या गेममध्ये फ्रान्सच्या कॉर्वीने थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र श्रीकांतने तो हाणून पाडला. पुरुष एकेरीतील दुसऱ्या सामन्यात बी.साई प्रणीतने इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुकावर १४-२१, २१-१८, २१-१९ असा विजय मिळवला. 


महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालने स्वित्झर्लंडच्या सॅब्रिना जॅकेटला २१-११, २१-१२ असे सहज नमवले.