लंडन : जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बोल्टला आपल्या कारकिर्दीतील शेवटी शर्यत जिंकता आली नाही. अनपेक्षितपणे अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीनने ही धाव ९.९२ सेकंदात पुर्ण केली. तर अमेरिकेच्याच क्रिश्चन कोलमनने ९.९४ सेकंदात धाव पुर्ण करत रौप्य पदक पटकावले. युसेन बोल्टने ही रेस ९.९५ सेकंदात पुर्ण करुन कांस्य पदक पटकावले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रॅकवर शेवटची धाव घेताना बोल्ट जेतेपद खेचून आणत या स्पर्धेतील १२वे सुर्वण पटकावेल अशी अपेक्षा होती. मात्र सुरुवात खराब झाल्याने संपूर्ण शर्यतीमध्ये बोल्ट अंतिम रेषेपर्यंत झगडताना दिसला. 


बोल्टने १०० मीटरचे अंतर ९.९५ सेकंदात पुर्ण केले. मात्र जस्टीनने हेच अंतर ९.९२ सेकंदात पुर्ण केले. अंतिम निकाल लागताच बोल्टने त्याला जाऊन मिठी मारत त्याचे अभिनंदन केले.