मॉस्को : क्रोएशिय आणि इंग्लंडमध्ये रंगलेल्या सेमीफायनलमध्य़े दोन्ही संघांनी 1-1 गोल करत सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केली. पण नंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त वेळेत 109व्या मिनिटाला मारिया मांड्जुकिकने गोल करत क्रोएशियाने बुधवारी रात्री दूसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर 2-1 ने मात केली आणि फिफा वर्ल्डकपच्या 21व्या वर्षात फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. क्रोएशिया पहिल्यादा वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचली आहे. रविवारी त्यांचा सामना आता 1998 ची वर्ल्डकप विजेती फ्रान्स टीमसोबत होणार आहे. तर इंग्लंड तिसऱ्या स्थानासाठी शनिवारी बेल्जियम विरुद्ध लढणार आहे. क्रोएशिया पहिल्या हाफमध्ये एक गोलने मागे होता. पण दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी बाजी मारली आणि 1 गोल केला. वेळ संपल्यानंतर दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीवर होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांड्जुकिकने हा गोल ईवान पेरीसिककडे केला. पेरीसिकने बॉक्समध्ये मांड्जुकिकडे बॉल दिला. ज्याने खूप सोप्या पद्धतीने गोल केला. त्यानंतर क्रोएशियाने 2-1 ने हा सामना जिंकला. पहिल्या गोलनंतर इंग्लंडकडे गोल करण्याची 3 ते 4 वेळा संधी आली पण इंग्लंडला गोल करता आला नाही. ज्यामुळे वर्ल्डकप जिंकण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. लिंगार्ड आणि रहीम स्टर्लिगने या महत्त्वाच्या सामन्यात सोपी संधी घालवली. जर या दोघांनी तेव्हा गोल केले असते तर आज इंग्लंड फायनलमध्ये असता.


क्रोएशियाने ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडची सुरुवात चांगली झाली पण संधीचा योग्या फायदा करता न आल्याने इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. हॅरी मॅग्यूर यावेळी योग्य हेडर नाही मारु शकला. केन 30व्या मिनिटाला क्रोएशियाचा गोलकीपरला चकवू नाही शकला. रिबाउंडवर गोल करण्याची देखील त्य़ाला संधी होती पण तो अयश्वी राहिला. 36व्या मिनिटाला लिंगार्डने बॉल बाहेर टाकत आणखी एक संधी गमवली. क्रोएशिया मात्र शांत नव्हता. त्यांनी पराभव स्विकारला नव्हता. मजबूत मिडफील्डसाठी जाणली जाणारी या टीमने 19 ते 23 मिनिटामध्ये 3 वेळी गोल करण्याची संधी बनवली.


क्रोएशियाने हार मानासला तयार नव्हती. 68व्या मिनिटाला पेरीसिकने बरोबरी करत गोल केले. पेरीसिकने वॉल्करला चकवत बॉल सिमे वसाल्जकोकडे सोपवला. ज्याने पेरीसिकला रिटर्न पास दिला. यावेळी मात्र पेरीसिकने चूक नाही केली आणि गोल करत क्रोएशिया टीमचा उत्साह वाढवला. तीन मिनिटानंतर देखील आणखी एक संधी त्यांना मिळाली पण पेरीसिकची किक गोलपोस्टला लागून परत आली.


क्रोएशियाने त्यानंतर पूर्णपणे इंग्लंडवर दवाब बनवला होता. या दबावात पण इंग्लंडचा गोलकीपर जॉर्न पिकफोर्ड आपलं काम करत होता. क्रोएशियाला दुसरा गोल करण्यापासून त्याने रोखलं. पण अतिरिक्त वेळ दिल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये मांड्जुकिकने शानदार गोल करत क्रोएशियाला फायनलमध्ये पोहोचवलं.