मुंबई : २०१९ वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये नवोदितांबरोबरच अनुभवी खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. भारताचा सगळ्यात अनुभवी खेळाडू एमएस धोनीचा हा चौथा वर्ल्ड कप असेल, तर कर्णधार विराट कोहली तिसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळेल. रोहित शर्मा, शिखर धवन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे दुसऱ्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहेत. तर २००७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीममध्ये असलेल्या दिनेश कार्तिकचं २०१९ सालच्या वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये केएल राहुल, हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह हे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळतील.


२०१५ वर्ल्ड कपच्या ७ जणांना डच्चू


दरम्यान २०१५ वर्ल्ड कपच्या टीममधल्या ८ जणांना या वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आलेली नाही. आर. अश्विन, स्टुअर्ट बिनी, अक्सर पटेल, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहित शर्मा आणि उमेश यादव हे २०१५ सालचा वर्ल्ड कप खेळलेले ८ जण यंदाच्या वर्ल्ड कप टीममध्ये नाहीत.


अशी असणार भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर