नवी दिल्ली : वेस्टइंडीजनं ३० मेपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप (World Cup 2019)साठी बुधवारी रात्री टीमची घोषणा केलीय. यासोबतच वर्ल्डकपसाठी सर्व १० टीम आता निश्चित झाल्यात. 'इंग्लंड एन्ड वेल्स'मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी न्यूझीलंडनं सर्वात अगोदर टीमची घोषणा केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतानंही आपापल्या १५-१५ सदस्यीय टीमची घोषणा केली. तर वेस्टइंडीज आपली टीम घोषित करणारा शेवटचा देश ठरला. विशेष म्हणजे, इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्डकपसाठी यजमानपद भुषवणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमध्ये होणाऱ्या या वर्ल्डकपची दावेदार टीम म्हणून यजमान टीमकडेच पाहिलं जातंय. उल्लेखनीय म्हणजे, आत्तापर्यंतनं इंग्लंडनं कधीही वर्ल्डकप जिंकलेला नाही. इंग्लंडनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाकडे विजेतेपदाचा दावेदार म्हणून पाहिलं जातंय.


या आहेत १० टीम आणि त्यांचे सदस्य


भारत


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, विजय शंकर, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी


पाकिस्‍तान


सरफराज अहमद (कर्णधार आणि विकेटकीपर), आबिद अली, बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, ह‌ॅरिस सोहेल, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, फहीम अशरफ, शाहीन शाह अफरीदी, जुनैद खान और मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक


ऑस्ट्रेलिया


एरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉफ, एलेक्स कॅरी, नाथन कूल्टर-नाइल, पैट कमिंस, उस्मान ख्वाजा, नाथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाए रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वार्नर और एडम जम्पा.


इग्‍लंड


इयोन मोर्गन (कर्णधार), मोइन अली, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, टॉम कुरैन, जोए डेनले, एलेक्स हेल्स, लियाम प्लांकट, आदिल राशिद, जोए रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेविड विले, क्रिस वोक्स और मार्क वुड


न्यूजीलंड


केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, हेनरी निकोल्स, रॉस टेलर, टॉम लाथम, टॉम ब्लंडेल, कॉलिन मुनरो, कॉलिन डी ग्रैंडहोम, जिमी नीशम, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मैट हेनरी, मिचेल सैंटनर, ईश सोढ़ी


दक्षिण आफ्रिका


फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, जेपी ड्युमिनी, डेविड मिलर, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), डेल स्टेन, एंडिले फेहलुकवायो, इमरान ताहिर, कैगिसो रबाडा, ड्वेन प्रीटोरियस, एनरिक नॉर्त्जे, लुंगी एंगिडी, एडेन मार्क्रम, रास वान डर डुसेन, तबरेज शम्सी


वेस्टइंडीज


जॅसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, एविन लुईस, शिमरॉन हेटमायर, शाई होप, निकोलस पूरन, फैबियन एलेन, डॅरेन ब्रावो, आंद्रे रसेल, कार्लोस ब्रैथवेट, शेल्डन कॉटरेल, शैनन गैब्रियल, एश्ले नर्स, केमार रोच, ओशाने थॉमस.


श्रीलंका


दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, एंजेलो मॅथ्यूज, तिसारा परेरा, कुसल परेरा, धनंजय डिसिल्वा, कुसल मेंडिस, इसुरू उदाना, मिलिंदा सिरिवर्धने, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरू थिरिमन्ने, जैफ्री वेंडरसे, नुवान प्रदीप और सुरंगा लकमल


बांग्लादेश


मशरफे मुर्तझा (कर्णधार), तमीम इकबाल, महमूदउल्लाह, मुशफिकुर रहीम, शाकिल अल हसन (उपकर्णधार), सौम्य सरकार, लिटन दास, शब्बीर रहमान, मेहंदी हसन मिर्जा, मोहम्मद मिथुन, रुबेल हुसैन, मुस्तफिजुर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोसद्देक हुसैन, अबु जायेद


अफगानिस्तान


गुलबदीन नईब (कर्णधार), मोहम्मद शहजाद (विकेटकीपर), नूर अली जादरान, हजरतुल्लाह जजई, रहमत शाह, असगर अफगान, हशमतुल्ला शाहिदी, नजीबुल्लाह जादरान, समीउल्लाह शेनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दवालत जादरान, आफताब आलम, हामिद हसन और मुजीब उर रहमान