लीड्स : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने विक्रमाला गवसणी घातली आहे. वनडे क्रिकेटमध्ये बुमराहच्या १०० विकेट झाल्या आहेत. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला बुमराहने १० रनवर माघारी पाठवलं आणि वनडे क्रिकेटमधलं आपलं विकेटचं शतक पूर्ण केलं. वनडेमध्ये सगळ्यात जलद १०० विकेट घेणारा बुमराह हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. बुमराहने ५७व्या मॅचमध्ये १०० विकेटचा टप्पा गाठला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद शमीने भारताकडून सगळ्यात जलद १०० विकेट घेतल्या आहेत. शमीने ५६ मॅचमध्ये १०० विकेट मिळवल्या. तर इरफान पठाणने ५९ मॅचमध्ये, झहीर खानने ६५ मॅचमध्ये, अजित आगरकरने ६७ मॅचमध्ये आणि जवागल श्रीनाथने ६८ मॅचमध्ये १०० विकेट घेतल्या होत्या.


या मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंकेची पहिल्या फेरीतली ही शेवटची मॅच आहे. सेमी फायनलसाठी टीम इंडिया आधीच क्वालिफाय झाली आहे, तर श्रीलंकेचं सेमी फायनलचं आव्हान संपुष्टात आलं आहे.


टीम इंडियाने या मॅचमध्ये दोन बदल केले आहेत. युझवेंद्र चहल आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली आहे. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाला मिळाली आहे.


श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आणि दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल.


टीम इंडिया


रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह


श्रीलंकेची टीम 


दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, लाहिरु थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डिसिल्वा, थिसरा परेरा, इसुरु उडाना, कासुन रजिता, लसिथ मलिंगा