साऊथम्पटन : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. रोहित शर्माचं शतक आणि युझवेंद्र चहलच्या शानदार बॉलिंगमुळे टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी दिली. युझवेंद्र चहलने १० ओव्हरमध्ये ५१ रन देऊन दक्षिण आफ्रिकेच्या ४ विकेट घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या विजयानंतर युझवेंद्र चहल म्हणाला, 'बुद्धीबळाने मला धैर्यवान बनवलं आहे. बुद्धीबळामुळे मी रणनिती बनवायला शिकलो. बुद्धीबळ खेळताना तुम्ही १५-१६ चालींचा आधीच विचार करता. तशाच पद्धतीने मी फॅफ डुप्लेसिसला बॉलिंग टाकतानाही रणनिती बनवली होती. फॅफची विकेट मला खूप आवडली. मी ऑफ स्टम्पवर स्लायडर टाकण्याची योजना बनवली आणि ते फॅफला कळलंच नाही.'


या मॅचनंतर विराट कोहलीनेही चहलचं कौतुक केलं. युझवेंद्र चहल मॅचची परिस्थिती कोणतीही असो, बॉलिंग करायला कधीच नकार देत नाही. पॉवरप्ले असो किंवा तुम्ही ३० यार्डामध्ये ७ खेळाडू ठेवलेत, तरी तो बॉलिंग करायला तयार असतो. त्याच्यामध्ये बराच आत्मविश्वास आहे. चहलची विचार करण्याची पद्धत दुसऱ्यांपेक्षा वेगळी आहे, असी प्रतिक्रिया कोहलीने दिली.


बुद्धीबळपटू युझवेंद्र चहल


क्रिकेटमध्ये यशस्वी होण्याआधी चहलने बुद्धीबळातही यश मिळवलं आहे. चहलनं अंडर १२ च्या बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ग्रीसमधली वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशीप, कोझिकोडमध्ये झालेली एशियन यूथ चेस चॅम्पियनशीपमध्ये चहल भारताकडून खेळला. २००३ मध्ये चहल ११ वर्षांचा असताना तो भारताकडून बुद्धीबळ खेळला होता.


p>