साऊथम्पटन : क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तानी खेळाडूंमधली स्पर्धा आपण नेहमीच बघतो. पण मैदानाबाहेर दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांचं कौतुक करताना दिसतात. टीम इंडियाने २०१९ वर्ल्ड कपची पहिली मॅच जिंकली. यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने एमएस धोनीचं कौतुक केलं आहे. एमएस धोनी हा कॉम्प्यूटरपेक्षाही जलद आहे. एखाद्या विकेटबद्दल कॉम्प्यूटरपेक्षाही धोनी जास्त जलद सांगतो, असं शोएब म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीने ३४ रनची खेळी केली. मोक्याच्या क्षणी धोनीने रोहित शर्माबरोबर पार्टनरशीप केली. विकेट कीपिंग करतानाही धोनीने एक स्टम्पिंग केला.


याचबरोबर शोएब अख्तरने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग केलेल्या केएल राहुलचीही स्तुती केली. 'एक क्रिकेटपटू म्हणून मला केएल राहुल आवडतो. राहुल कोहलीच्या पावलावर पाऊल टाकू शकतो, आणि भविष्यात चांगला बॅट्समन होऊ शकतो. खेळत नसताना आपला राग ट्रेनिंगमध्ये काढ, असा सल्ला राहुलला दिला होता. आपली एकाग्रता कायम ठेव. मला वाटतं तो भविष्यात मोठा खेळाडू होऊ शकतो,' असं वक्तव्य शोएबने केलं.


केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ रन केले होते. राहुलचे हे रन महत्त्वाच्या वेळी आले होते. शिखर धवन आणि विराट कोहली लवकर आऊट झाल्यानंतर टीम इंडियाची बॅटिंग गडबडली होती. पण राहुलने रोहितसोबत पार्टनरशीप करून इनिंगला आकार दिला. रोहित शर्माने या मॅचमध्ये नाबाद शतक करून टीम इंडियाला जिंकवून दिलं. त्याआधी बॉलिंग करताना युझवेंद्र चहलने १० ओव्हरमध्ये ५१ रन देऊन ४ विकेट घेतल्या.


p>