लॉर्ड्स : टीम ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला विजयासाठी २८६ रनचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून २८५ रन केल्या. ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन एरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सर्वाधिक रन केल्या. या दोघांनी प्रत्येकी १०० आणि ५३ रन केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 


ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी एरॉ़न फिंच आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२३ रन जोडल्या. या सेट जोडीला तोडण्यास मोईन अलीला यश आले. त्याने सातत्याने चांगली कामगिरी करत असलेल्या डेव्हिड वॉर्नरला ५३ रनवर आऊट केले. वॉर्नर आऊट झाल्यानंतर उस्मान ख्वाजा मैदानात आला. एरॉन फिंच आणि ख्वाजा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५० रन जोडल्या. ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का १७३ स्कोअर असताना लागला. उस्मान ख्वाजा २३ रन करुन माघारी परतला.


यानंतर ऑस्ट्रेलियाने ठराविक टप्प्याने विकेट टाकल्या. ख्वाजानंतर एकाही खेळाडूला जास्त वेळ मैदानात टिकता आले नाही. सलामीवीरांचा अपवाद वगळता, स्टीव्ह स्मिथ आणि एलेक्स कॅरी या दोघांनी ३८ रन केल्या.


इंग्लंडकडून ख्रिस वोक्स याने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर जोफ्रा आर्च्रर, मार्क वूड, बेन्स स्टोक्सने आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १ विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या खेळीला खिळ घातली.


इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर पारंपरिक टीम आहेत. त्यामुळे ही मॅच दोन्ही टीमसाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे टीम इंग्लंड विजयी आव्हान पार पाडते की ऑस्ट्रेलिया आपली २७ वर्षांपासूनची विजयी परंपरा कायम ठेवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.