लंडन : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवली. या मॅचसाठी भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टेडियममध्ये गर्दी केली होती. मॅचच्या पहिल्या इनिंगदरम्यान काही प्रेक्षकांनी स्मिथ आणि वॉर्नरची चेष्टा केली. यावेळी विराटने भारतीय चाहत्यांना अशी कृती न करता स्मिथ आणि वॉर्नरसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. कोहलीच्या या मोठेपणासाठी स्मिथने त्याच्याजवळ येऊन त्याचे आभार मानले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या या खिलाडूवृत्तीचं सगळे जण कौतुक करत आहेत. पण इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्टन याने विराटवर निशाणा साधला आहे. विराट कोहलीला मैदानातल्या प्रेक्षकांना असं सांगण्याचा अधिकार नाही, असं निक कॉम्टन म्हणाला आहे. निक कॉम्टनने त्याच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.



अनधिकृतपणे बॉल कुरतडरल्या प्रकरणी स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी टाकण्यात आली होती. वर्षभरानंतर त्यांनी वर्ल्ड कप टीममध्ये आगमन केले. या दोन्ही खेळाडूंनी झालेल्या प्रकाराबाबत माफी देखील मागितली. परंतु भारतीय प्रेक्षकांच्या मनातील राग कमी झाला नव्हता. मॅचदरम्यान मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी स्मिथ आणि वॉर्नरची चेष्टा केली. हा सर्व प्रकार मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये घडला. त्यावेळेस मैदानात कोहली बॅटींग करत होता.


काय म्हणाला कोहली ?


'क्रिकेट प्रेक्षकांकडून झालेल्या कृतीसाठी मी माफी मागतो. वॉर्नर आणि स्मिथला डिवचण्याचा प्रकार याआधी देखील झाला आहे. या मॅचदरम्यान मोठ्या प्रमाणावर टीम इंडियाचे समर्थक उपस्थित होते. वॉर्नर आणि स्मिथ यांच्यावर टीका करण्यासारखं त्यांनी काहीचं केले नाही. त्यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांनी शिक्षा भोगली आहे. जे झालं ते पुन्हा पुन्हा बोलून एखाद्याचं मनोधर्य़ कमी करु नये. तो चांगली कामगिरी करतो आहे. चाहत्यांकडून या दोन्ही खेळाडूंना देण्यात आलेली वागणूक मला योग्य वाटली नाही. त्यासाठी मी भारतीय चाहत्यांच्या वतीने माफी मागतो.' असं विराट म्हणाला.