लंडन : वर्ल्ड कप जिंकण्यासाठी इंग्लंडला २४२ रनचं आव्हान मिळालं आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये २४१/८ एवढा स्कोअर केला. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरलेल्या मार्टिन गप्टीलला या मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली, पण तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. गप्टील १९ रन करून आऊट झाला. तर गप्टीलबरोबर ओपनिंगला आलेला हेन्री निकल्स ५५ रन करून आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गप्टीलची विकेट सुरुवातीला गेल्यानंतर निकल्स आणि कर्णधार केन विलियमसनने न्यूझीलंडचा डाव सावरायला सुरुवात केली. पण केन विलियमसन ३० रनवर माघारी परतला. टॉम लेथमने ५६ बॉलमध्ये ४७ रन करून न्यूझीलंडला २४० रनपर्यंत पोहोचवलं.


इंग्लंडकडून लियाम प्लंकेट आणि क्रिस वोक्सला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा


वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने सलग दुसऱ्यांदा धडक मारली आहे. तर इंग्लंड तब्बल २७ वर्षांनंतर फायनलमध्ये पोहचली आहे. फायनल मॅच खेळण्याची इंग्लंडची ही चौथी वेळ आहे. वर्ल्ड कपचं यजमान पद इंग्लंडकडे असल्याने इंग्लंडला वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार समजलं जात आहे.