World Cup 2019 :  साधारण दीड महिन्यापासून सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाचा आज शेवट होणार आहे. यजमान इग्लंड त्यांत्याच भूमीवर न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाशी पुरुष एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत लढणार आहे. दोन्ही संघांचा विश्वचषकातील प्रवास आणि त्यानंतर त्यांनी मिळवलेलं अंतिम फेरीतील स्थान पाहता या जेतेपदासाठीची लढत चुरशीची होणार यात वाद नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर विश्वचषकाची अंतिम लढत पार पडणार आहे. उपांत्य सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय क्रिकेट संघाव मात करणारा न्यूझीलंड संघ आणि ऑस्ट्रेलियावर मात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाचा आत्मविश्वास पाहता आता या सामन्यात कोणाचं पारडं जड असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


न्यूझीलंड विश्वचषक स्पर्धेत नेहमीच 'डार्क हॉर्स' म्हणून गणला जाणारा संघ. या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषकाला गवसणी घालता आलेली नाही. मात्र या संघानं नेहमीच अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली. यावेळी किवींनी भारताला पराभूत करत अंतिम फेरी गाठल्यामुळे न्यूझीलंडच विजेतेपद पटकावणार असं भाकित अनेकजण वर्तवू लागले आहेत. 


आतापर्यंतच्या इतिहासात विश्वविजेतेपदाने इंग्लंडला तीन वेळा आणि न्यूझीलंडच्या संघाला तुरी दिली आहे. पण, यांदाच्या वर्षी मात्र विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक नवा जगज्जेता संघ सर्वांसमोर येणार आहे. तेव्हा गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा संघ विश्वचषकाचा अंतिम सामना गाजवणार की फलंदाजीच्या माऱ्याने किवींचा संघ त्यांच्यावर मात करणार हे पाहणं अतीव महत्त्वाचं ठरणार आहे. 


या खेळाडूंवर असेल साऱ्यांचं लक्ष कारण, त्यांच्या रंगू शकते  लढत 


जेसन रॉय विरुद्ध ट्रेंट बोल्ट
जो रुट विरुद्ध मॅट हेन्री
जॉनी बेअरस्टो विरुद्ध लॉकी फर्ग्युसन 
केन विल्यमसन विरुद्ध जोफ्रा आर्चर   
रॉस टेलर विरुद्ध  मार्क वूड     
मार्टिन गप्टिल विरुद्ध आदिल राशिद