बर्मिंघम : मंगळवारी पार पडलेलल्या विश्वचषक स्पर्धेच्या समान्याच भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशच्या संघाचा पराभव केला. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाने ३१४ धावांचा डोंगर अभा केला. भारतीय संघातील खेळाडूंच्या फलंदाजीत या सामन्यादरम्यान समतोल पाहायला मिळाला. त्यातच रोहित शर्माने संघाला भक्कम पाया रचून दिल्यामुळे आणि शतकी खेळी केल्यामुळे धावसंख्येचा हा आकडा गाठता आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धच्या क्रिकेट सामन्यात रोहितची खेळी विशेष लक्षवेधी ठरली. किंबहुना सुरुवातीपासूनचत टिकून असणारा त्याचा फॉर्म या सामन्यातही पाहता आला. त्याने या सामन्यात ९२ चेंडूंमध्ये १०४ धावा केल्या. ज्यामध्ये सात चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. 


सीमारेषेपल्याड फटका मारत षटकार करणाऱ्या रोहितने असाच एक चेंडू भिरकावला, तो षटकारासाठी गेलासुद्धा पण, प्रेक्षकांमध्ये असणाऱ्या एका भारतीय संघाच्या चाहतीला तो लागला. 



मीना नावाच्या या चाहतीला चेंडू लागल्याचं रोहितनेही पाहिलं. अखेर सामना संपल्यानंतर त्याने तिची भेट घेतली आणि सही केलेली एक टोपी तिना भेट स्वरुपात दिली, तिच्याशी संवादही साधला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. कारण हे सारंकाही तिच्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं.  सामन्याची हे क्षण पाहता रोहितने खऱ्या अर्थाने मैदानावरील खेळीनेच नव्हे तर, मैदानाबाहेरील त्याच्या जबाबदार वागण्यानेही सर्वांचीच मनं जिंकली.