बर्मिंघम : भारताविरुद्धच्या मॅचमध्ये इंग्लंडने मोठी धावसंख्या उभारली आहे. ५० ओव्हरमध्ये इंग्लंडचा स्कोअर ३३७/७ एवढा झाला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडची सुरुवात भेदक झाली. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या ओपनरनी २२ ओव्हरमध्येच इंग्लंडचा स्कोअर १६० रनपर्यंत पोहोचवला. पण यानंतर टीम इंडियाच्या बॉलरनी पुनरागमन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडकडून बेयरस्टोने १०९ बॉलमध्ये १११ रनची खेळी केली. तर बेन स्टोक्सने ५४ बॉलमध्ये ७९ रन केले. जेसन रॉय ५७ बॉलमध्ये ६६ रन करून आऊट झाला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. तरी शेवटच्या काही ओव्हरमध्ये शमीने खराब बॉलिंग केली. ४७व्या ओव्हरमध्ये शमीने १७ रन आणि ४९ व्या ओव्हरमध्ये १५ रन दिले.


मोहम्मद शमीने दिलेल्या या रनची भरपाई जसप्रीत बुमराहने शेवटच्या ओव्हरमध्ये केली. शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहने फक्त ३ रन दिले. शेवटच्या १० ओव्हरमध्ये इंग्लंडने ९२ रन काढले. 


वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये प्रवेशाचं आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या टीमची ही मॅच भारताने जिंकावी अशी इच्छा असेल. कारण सेमी फायनलच्या प्रवेशासाठी या दोन्ही टीमचा फायदा होऊ शकतो.