मँचेस्टर : महेंद्रसिंह धोनीने न्यझीलंड विरुद्धच्या सेमीफायनल मॅचसाठी मैदानात उतरताच एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाकडून असा रेकॉर्ड करणारा तो दुसराच खेळाडू ठरला आहे.


काय आहे रेकॉर्ड ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडेमध्ये आपल्या टीमसाठी सर्वाधिक मॅच खेळण्याचा हा रेकॉर्ड आहे. न्यूझीलंडविरुद्धची आजची मॅच ही धोनीच्या वनडे कारकिर्दीतील ३५०वी मॅच ठरली आहे. टीम इंडियाकडून सर्वाधिक वनडे खेळणारा धोनी हा दुसराच खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर टीम इंडियाकडून आणि सर्वाधिक वनडे खेळण्याचा रेकॉर्ड आहे. सचिनने वनडेमध्ये सर्वाधिक ४६३ मॅच खेळल्या आहेत.


वनडे क्रिकेटमध्ये सचिननंतर सर्वाधिक वनडे खेळण्याचा बहुमान श्रीलंकेच्या महेला जयवर्धनच्या नावावर आहे. जयवर्धनने ४४८ मॅच खेळल्या आहेत. यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर सनथ जयसूर्या आणि कुमार संगकाराचा क्रमांक लागतो. सनथ जयसूर्याने ४४५ तर संगकाराने ४०४ वनडे मॅच खेळल्या आहेत.


धोनीची कामगिरी


धोनीने विकेट कीपिंग करताना ३५० मॅचमध्ये ४४४ विकेट घेतल्या. यामध्ये ३२१ कॅच आणि १२३ स्टम्पिंगचा समावेश आहे. तर बॅटिंग करताना धोनीने ५०.५८ च्या सरासरीने १०,७२३ रन केले. यामध्ये १० शतकं आणि ७२ अर्धशतकं आहेत.