मॅनचेस्टर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाली पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. पावसाचा खेळ सुरु झाला तेव्हा, न्यूझीलंडचा स्कोअर ४६.१ ओव्हरमध्ये २११/५ एवढा होता. या मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला असला तरी, पाऊस थांबल्यास आजच्याच दिवशी मॅच सुरू होईल. अशात डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला किती रनचं आव्हान मिळेल याचं गणित आता समोर आलं आहे. 


डकवर्थ लुईस नियमानुसार भारतापुढील आव्हान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

४६ ओव्हरची मॅच झाली तर भारताला विजयासाठी २३७ रनची गरज 


४० ओव्हरची मॅच झाली तर भारताला २२३ रनची गरज 


३५ ओव्हरची मॅच झाली तर भारताला विजयासाठी २०९ रनची गरज 


३० ओव्हरची मॅच झाली तर भारताला १९२ रनची गरज 


२५ ओव्हरची मॅच झाली तर भारताला १७२ रनची आवश्यकता 


२० ओव्हरची मॅच झाली तर भारताला १४८ रनचं आव्हान