बर्मिंगहॅम : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात १९ जूनला मॅच खेळण्यात आली. यामॅचमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेटने पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपली विजयी कामगिरी कायम ठेवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केन विलियमसनने आफ्रिकेविरुद्ध १०६ रनची नॉटआऊट खेळी केली. या शतकी खेळीसोबतच केन विलियमसनने रेकॉर्डब्रेक केला. केन विलियमसनने रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला. इंग्लंडमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये हजार धावा पूर्ण करण्याचा हा रेकॉर्ड आहे.


रोहित शर्माने सर्वात कमी इनिंगमध्ये इंग्लंडमध्ये हजार रनांचा टप्पा पूर्ण केला होता. रोहित शर्माने नुकत्याच १६ जूनला पाकिस्तान विरुद्धात झालेल्या मॅचमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. रोहितने पाकिस्तान विरुद्ध १४० रनची शतकी कामगिरी केली होती. रोहितने १८ इनिंगमध्ये इंग्लंडमध्ये हजार धावा पूर्ण केल्या होत्या.      


केन विलियमसनने आफ्रिकाविरुद्ध १०४ रनची खेळी केली. यासोबतच त्याने हजार धावांचा टप्पा पू्र्ण केला. त्याने ही कामगिरी १७ इनिंगमध्ये पूर्ण केली. त्यामुळे केन विलियमसनने रोहितचा रेकॉर्डबेक केला आहे.


इंग्लंडमध्ये वेगवान १००० धावा पूर्ण करणारे खेळाडू


१७ इनिंग्स - केन विलियमसन


१८ इनिंग्स - रोहित शर्मा


१९ इनिंग्स - शिखर धवन


२१ इनिंग्स - विवियन रिचर्ड्स


२२ इनिंग्स - राहुल द्रविड/ मार्कस ट्रेस्कोथिक


२३ इनिंग्स - जॉनी बेयरस्टो