मुंबई : अचूक निर्णय, वाऱ्यापेक्षा वेगवान स्टम्पिंग आणि हटके स्टाईल विकेटकीपींगसाठी धोनी ओळखला जातो. धोनीची स्टम्पमागील हूशारी आपण याआधी अनेकदा पाहिली आहे. धोनीच्या दिशेने आलेला बॉल तो स्टम्प न पाहता थेट थ्रो करुन खेळाडूला रनआऊट करतो. धोनीच्या या स्टाईलमुळे अनेकजण त्याचे चाहते आहेत. परंतु असा हटके स्टाईल रन आऊट एका विकेटकीपरने २७ वर्षाआधीच केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण मोरे. वर्ल्ड कपमध्ये जावेद मियादाद-किरण मोरे यांच्यात झालेला भन्नाट प्रसंग आपल्याला माहिती आहे. किरण मोरे यांनी २७ वर्षांपूर्वी १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत धोनीसारखंच स्टम्प न पाहता रन आऊट केलं होतं. न्यूझीलंडचे तेव्हाचे कर्णधार मार्टिन क्रो यांना रन आऊट केलं.



वर्ल्ड कप १९९२ च्या स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे करण्यात आले होते. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात १२ जून १९९२ ला हा सामना खेळण्यात आला होता. किवींनी टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतल्यावर टीम इंडियाने निर्धारित ५० ओव्हरमध्ये ५ विकेटच्या मोबदल्यात २३० रन केल्या.


टीम इंडियाने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सावध सुरुवात झाली. १९९२ च्या वर्ल्डकपरम्यान न्यूझीलंडचा कॅप्टन मार्टिन क्रो धडाकेबाज खेळी करत होते. प्रतिस्पर्धी टीम मार्टिन क्रो यांना आऊट करण्याच्या प्रयत्नात असायच्या. भारताविरुद्धच्या मॅचमध्येही मार्टिन क्रो यांना चांगली सुरुवात मिळाली होती. ते २७ बॉलमध्ये २६ रन करुन खेळत होते. त्यावेळी न्यूझीलंडचा स्कोअर २ विकेटवर १६२ होता. 


मैदानात खेळत असलेले मार्टिन क्रो आणि एन्ड्रयू जोन्स हे दोन्ही खेळाडू सेट होते. टीम इंडियाला विकेटची गरज होती. बॉलर्सना विकेट घेण्यास अपयशी ठरत होते. त्यावेळेस किरण मोरे यांची चलाखी कामी आली. वेंकटपति राजू बॉलिंग करत असताना मार्टिन क्रो यांनी बॉल डिफेंस केला आणि चोरटी रन घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस किरण मोरे यांनी उजव्या बाजूला उडी मारत बॉल पकडला. स्टम्पकडे न पाहता त्यांनी धोनी ज्या प्रमाणे थ्रो करतो तसाच थ्रो केला आणि मार्टिन क्रो माघारी परतले. किरण मोरे यांनी केलेला रन आऊट पाहून मैदानातील सगळेच अवाक झाले होते.