मुंबई : विश्वचषक क्रिकेट २०१९ स्पर्धेत टीम इंडियाला १८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडली. न्यूझीलंडने चांगला खेळ करत अंतिम सामन्यात धडक मारली. दोन्ही संघानी चांगली कामगिरी केली. मात्र, टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजानी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे २४० धावांचे टार्गेट पूर्ण करताना नाकीनऊ आले. दरम्यान, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिग धोनी यांनी टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मात्र, या सामन्यात धोनीने अखेरपर्यंत बाजीपणाला लावली. मात्र, चेंडू कमी आणि धावा जास्त असल्याने दोन धावा घेताना धोनी धावबाद झाला. धोनी आऊट झाल्याने क्रिकेटप्रेमी निराश झाले आता सगळे संपले, असेच भाव चेहऱ्यावर दिसत होते. मात्र, धोनीची गणना सर्वात वेगाने धावा घेणाऱ्या फलंदाजांमध्ये होते. परंतु धोनी अखेरच्या विश्वचषक स्पर्धेतील लढतीत धावचीत झाला. तसेच तो कारकिर्दीतील पहिल्या सामन्यातही धावचीत झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


Image Credits: Twitter/@BCCI


भारत - न्यूझीलंड सेमी फायनल सुरुवात झाली. मात्र, पहिल्या दिवशी पाऊस आल्याने सामना दुसऱ्या दिवशी खेळवला गेला. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करत न्यूझीलंडचे खेळाडू झटपट बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, टीम इंडिया मैदानात उतरली. त्यानंतर पहिले तीन आघाडीचे खेळाडू झटपट बाद झालेत. या विश्वचषक स्पर्धेत पाच शतके ठोकणारा मुंबईचा 'हिट मॅन' म्हणून ओळख असलेला रोहित शर्मा केवळ १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीही १ धावेवर पायचीत झाला. के. एल. राहुलही झेल देऊन १ धावेवर तंबूत परतला. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची सुरुवातीलाच निराशाच झाला. पहिल्याच ४ षटकांत टीम इंडियाचे ५ धावात ३ फलंदाज तंबूत परतले. त्यावेळी २४० धावांचे आव्हान पार करणे अशक्य वाटत होते. मात्र, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी आशा जिवंत केली. मात्र, धोनीने चोरटी धाव घेण्याचा नादात धावचीत झाला आणि क्रिकेट स्टेडिअमवर सन्नाटा पसरला. मार्टिन गुप्टिलने अचूक आणि थेट थ्रो स्टंपवर केला आणि धोनी बाद झाला. या सामन्यामध्ये ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने मारलेल्या बेजबाबदार फटक्यांवरही टीका होऊ लागली आहे. मात्र, धोनीला सहानुभूती मिळत आहे.


दरम्यान, एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धची खेळताना धोनी आपल्या कारकिर्दीतील ३५०वा सामना खेळला. टीम इंडियाकडून सर्वाधिक एक दिवसीय सामने खेळणारा धोनी हा दुसराच खेळाडू आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर टीम इंडियाकडून आणि सर्वाधिक एक दिवसीय सामने खेळण्याचा विक्रम आहे. सचिनने वनडेमध्ये सर्वाधिक ४६३ सामने खेळले आहेत.