मँचेस्टर : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनल मॅच आज खेळली जात आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकून बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय बॉलरनी या वर्ल्ड कपमधली पावर प्लेमधली सगळ्यात किफायती बॉलिंग टाकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅटिंगदरम्यान न्यूझीलंडच्या नावे नकोसा रेकॉर्ड झाला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने पहिल्या १० ओव्हरमध्ये सर्वात कमी रन करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. न्यूझीलंडने पहिल्या १० ओव्हरमध्ये १ विकेट गमावून २७ केल्या. त्यामुळे न्यूझीलंडच्या नावे हा रेकॉर्ड झाला आहे.


मॅचच्या पहिल्या १० ओव्हरमध्ये ३० मीटरच्या बाहेर केवळ २ खेळाडू असतात. त्यामुळे फटकेबाजी करण्याची संधी असते. परंतु न्यूझीलंडच्या सलामीच्या  बॅट्समनना टीम इंडियाच्या बॉलर्सने फटकेबाजी करु दिली नाही. टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने टाकलेली पहिली ओव्हर मेडन होती. यानंतरच्या दुसऱ्या ओव्हरमध्येही जसप्रीत बुमराहने एकही रन दिली नाही.


भारताच्या बॉलरनी आपल्या भेदक बॉलिंगने न्यूझीलंडच्या बॅट्समनना हात खोलू दिले नाहीत. पहिल्या १० ओव्हरमधील ५ ओव्हर भुवनेश्वर तर ४ ओव्हर बुमराहने टाकली. तर १ ओव्हर हार्दिक पांड्ंयाने टाकली. 


या वर्ल्ड कपच्या पहिल्या १० ओव्हरमध्ये सर्वात कमी रन करण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावे होता. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध ही संथ खेळी केली होती. विजयासाठी आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने १० ओव्हरमध्ये २८ रन केल्या होत्या.


यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण ४६ मॅच खेळल्या गेल्या आहेत. यापैकी ही तिसरीच वेळ आहे, की ज्यावेळी बॅटिंग टीमला ३० रन बनवता आल्या नाही. टीम इंडिया, न्यूझीलंडनंतर वेस्ट इंडिजच्या नावे सर्वात कमी रन (पावर प्ले दरम्यान) करण्याचा रेकॉर्ड आहे. भारताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजने पहिल्या १० ओव्हरमध्ये २ विकेटच्या मोबदल्यात २९ रन केल्या होत्या. टीम इंडियाने ही मॅच १२५ रनच्या फरकाने जिंकली होती.