साऊथम्पटन : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी केली. फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. बुमराहने पहिले हाशिम आमलाला आणि मग क्विंटन डिकॉकला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. क्विंटन डिकॉकची विकेट घेतल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विटरवरून निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२३ दिवसांपूर्वी क्विंटन डिकॉकला दया दाखवली आणि चांगली वागणूक दिली, पण यावेळी मात्र बुमराहकडून कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. जबरदस्त बॉलिंग, असं ट्विट सेहवागने केलं.



आयपीएलच्या फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी बुमराहच्या बॉलिंगवर विकेट कीपिंग करताना क्विंटन डिकॉकने हाततला बॉ़ल सोडला. यामुळे चेन्नईला ४ बाईज रन मिळाल्या. १९व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला डिकॉकने ही चूक केली. पण या चुकीनंतरही बुमराहने खिलाडूवृत्ती दाखवली. क्विंटन डिकॉकच्या जवळ जाऊन बुमराहने त्याचं सांत्वन केलं होतं. याचीच आठवण सेहवागने करून दिली. अतंत्य रोमांचक अशा आयपीएल फायनलमध्ये १ रनने विजय झाला होता.