जोहान्सबर्ग : ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. फॅप डुप्लेसिस याच्या नेतृत्वामध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम वर्ल्ड कपमध्ये खेळेल. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष लिंडा झोंडी यांनी टीमची घोषणा केली. तसंच या टीमबद्दल आपण आनंदी आहोत, असं झोंडी म्हणाले. दक्षिण आफ्रिकेच्या टीमच्या घोषणेबरोबरच या वर्ल्ड कपमधली दक्षिण आफ्रिकेची जर्सीही लॉन्च करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली बंदी उठवल्यानंतर १९९२ सालच्या वर्ल्ड कपपासून दक्षिण आफ्रिका खेळत आहे. पण एकाही वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला नाही. याच कारणामुळे दक्षिण आफ्रिकेला नेहमीच चोकर्स म्हणूनही हिणवलं जातं. चोकर्सचा हा डाग पुसून वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच नाव कोरण्याचं आव्हान दक्षिण आफ्रिकेपुढे असणार आहे.


३० मे रोजी वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा सामना यजमान इंग्लंडशी होणार आहे.


दक्षिण आफ्रिकेची टीम


फॅप डुप्लेसिस (कर्णधार), क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, डेल स्टेन, एन्डिले पेहलुक्वायो, इम्रान ताहीर, कागिसो रबाडा, ड्वॅन प्रिटोरियस, एनरिच नॉर्टजे, लुंगी एनगीडी, एडन मार्करम, रसी वेड डसेन, हाशीम आमला, तबरेज शम्सी